भोपाळ, 10 डिसेंबर : मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नुनसरमधील जरोंद गावात बुधवारी सासू-सूनेच्या वादाने हिंस्त्र वळण घेतलं. या दोघींनी एकमेकांच्या गळ्यावर सुरा चालवला. या घटनेत सासूचा मृत्यू झाला असून मुलगा आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बुधवारी सकाळी घडला हा प्रकार
75 वर्षीय मोंगा बाई विश्वकर्मा यात्यांचा मुलगा राजेंद्र आणि सून रेखा यांच्यासोबत राहते. राजेंद्र याला दोन मुलं आहे. यापैकी एक 10 तर दुसरा अडीच वर्षांचा आहे. दोन्ही मुलं बुधवारी सकाळी अंगणात खेळत होते. घरात राजेंद्र, त्याची पत्नी आणि आई होती. यावेळी तिघांमध्ये काहीतरी वाद झाल्याचं शेजारच्यांनी सांगितलं. शेजारच्यांनी पोलिसांना सांगितलं की, सकाळी साधारण 10 वाजून 15 मिनिटांनी घरातील सून आरडा-ओरडा करीत बाहेर आली. तिचा गळा कापला होता आणि रक्त वाहत होतं. ती ओरडतच सांगत होती की तिच्या पतीने काही केलं नाही, तर मी मारलं आहे.
मुलगाही रक्ताळलेल्या अवस्थेत आला बाहेर
गावकरी मदतीसाठी येण्यापूर्वी राजेंद्रही घराबाहेर ओरडतच आला. घराबाहेर आल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. त्याच्याही गळ्यावर वार होते. जेव्हा गावकरी घरात आले तेव्हा पाहिलं तर मोंगा बाई यांचा गळा कापला होता. लोकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावले व तिघांना पाटन रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी मोंगा बाई यांना मृत घोषित केले. तर राजेंद्र आणि त्याची पत्नी यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं.
सासू-सूनेमध्ये नेहमीच सुरू होता वाद
याबाबत नेमकं सत्य गावकऱ्यांना माहिती नाही. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा हाती आलेल्या माहितीनुसार सासू-सूनांमध्ये नेहमी वाद होत असे. यामुळे घरात कटकट होत होती. पोलीस या प्रकरणाचा तपास दोन्ही बाजूंनी करीत आहे. पोलिसांना घरात धारदार शस्त्र सापडले आहेत. ज्यावर रक्त लागले आहे.
कोणी कापला गळा
या प्रकरणात एएसपी शिवेस सिंघ बघेत म्हणाले की, या प्रकरणाची सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेण्यात आली. तेथे सासू-सून आणि मुलाचा गळा कापलेल्या अवस्थेत होता. तिघांचा गळा कोणी कापला याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news