Home /News /crime /

अवैध दारूचा शोध घेत होते अधिकारी, मात्र असं काही सापडलं की, सर्वजण हैराण!

अवैध दारूचा शोध घेत होते अधिकारी, मात्र असं काही सापडलं की, सर्वजण हैराण!

कारच्या तपासादरम्यान मागील सीटच्या खाली तिजोरी तयार केली होती. त्यात असं काही सापडलं की....

  पाटना, 18 मे : बिहारमधील (Bihar News) गोपालगंजमध्ये उत्पादन विभागाच्या टीमला मोठं यश मिळालं आहे. ही टीम उत्तर प्रदेशातून बिहारला येत होती. बिहारमध्ये दारू बंदी आहे. त्यामुळे येथे अवैधपणे दारू साठवून ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. उत्तर प्रदेशातून बिहारच्या दिशेने येताना उत्पादन विभागाच्या टीमने एका कारची झडती घेतली. यावेळी दारूऐवजी अशी काही वस्तू सापडली जी पाहून अधिकारीही हैराण झाले. या प्रकरणात टीनने दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. उत्पादन विभागाची टीम बुधवारी अवैध दारूबाबत कुचायकोट पोलीस ठाणे येथील चेक पोस्टवर उत्तर प्रदेशाहून येणाऱ्या वाहनांचा तपास करीत होती. यादरम्यान एका कारमधून 232 किलोग्रॅम चांदी सापडली आहे. (team was looking for alcohol but found something that surprised everyone)
  गोपालगंजचे उत्पादन अधिक्षक राकेश कुमार यांनी सांगितलं की, कारच्या तपासादरम्यान मागील सीटच्या खाली तिजोरी तयार केली होती. ज्यात 232 किलोग्रॅम चांदी सापडली. या चांदीची किंमत बाजारात तब्बल दीड कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, या प्रकरणात कारचे चालक आणि अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. चौकशीत समोर आलं की, कारमधील चांदी उत्तर प्रदेशातील कानपूरहून दरभंगेला घेऊन जात होते. उत्पादन अधिक्षकांनी सांगितलं की, याबाबत पोलीस आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Alcohol, Bihar, Crime news

  पुढील बातम्या