Home /News /crime /

सावत्र बापाने असा काढला राग; 8 वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर दिले बिडीचे चटके

सावत्र बापाने असा काढला राग; 8 वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर दिले बिडीचे चटके

एका छोटाशा कारणावरुन सावत्र बापाने मुलावर राग काढला.

    हापुड, 13 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) हापुडमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील सावत्र बापाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केवळ एक 8 वर्षांचा मुलगा आपल्याला बाबा म्हणत नाही या रागातून त्याने मुलाला मारहाण केली. तो इथवरच थांबला नाही तर त्याने त्याने प्रायव्हेट पार्टला बिडीने चटके दिले. त्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. (The stepfather was so angry Bidi clicks on the private part of an 8 year old boy) पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर 24 तास यावर काहीच कारवाई केली नाही. मात्र जेव्हा या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. काय आहे प्रकरण? इंथोली पोलीस ठाणे (Police Station) हद्दीतील मेथना गावात एका महिलेचं लग्न 12 वर्षापूर्वी  राजपाल नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. राजपालकडून महिलेला 4 मुलं आहेत. 6 महिन्यांपूर्वी राजपाल याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजपाल हा ऑटो ड्रायव्हर होता. राजपालच्या मृत्यूनंतर त्याची तीन मुलं त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत होते. तर सर्वात लहान मुलगा आईसोबत राहत होता. यादरम्यान त्याच्या पत्नीची रचोली गावातील मनोज याच्याशी ओळख झाली. यानंतर महिला मुलाला घेऊन मनोजसोबत राहू लागली होती. हे ही वाचा-प्रियकरासोबत पळून गेल्याच्या 8 दिवसांत विद्यार्थिनीचा मृत्यू; कुटुंब हादरलं! बाबा म्हणाला नाही म्हणून दिली शिक्षा शुक्रवारी मनोज मुलाला घेऊन शाळेत गेला. येथे त्याला वडिलांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी मुलाने नकार दिला. त्यानंतर मनोजने घरी पोहोचल्यानंतर रागाच्या भरात मुलाला मारहाण केली. त्याच्या प्रायव्हेट पार्टला जळत्या बिडीचे चटके दिले. ज्यानंतर मुलगा जोरजोरात ओरडू लागला. यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलावर उपचार सुरू असून त्यानंतर आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh

    पुढील बातम्या