'या' सरकारी नियमासाठी मुलाने जन्मदात्या बापाची गळा चिरून केली हत्या; अत्यंत धक्कादायक प्रकार

कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची हव्यासापोटी हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही.

कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची हव्यासापोटी हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही.

  • Share this:
    झारखंड, 22 नोव्हेंबर : रामगड जिल्ह्यातील 35 वर्षीय बेरोजगार व्यक्तीने सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये (CCL) कार्यरत आपल्या वडिलांची कथित स्वरुपात यासाठी हत्या केली की त्याला अनुकंपाच्या आधारावर नोकरी मिळवता येईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची नोकरीच्या हव्यासापोटी हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही. पोलिसांनी सांगितलं की, जिल्ह्यातील बरकाकाना स्थित सीसीएलच्या सेंट्रल वर्कशॉपमध्ये प्रमुख सुरक्षा गार्डच्या रुपात तैनात 55 वर्षीय कृष्मा राम हे गुरुवारी मृत सापडले होते आणि त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे दिसत होते. हे ही वाचा-'मी घाबरत नाही पण...सॉरी बाबा'; सुसाइड नोट लिहून ITI विद्यार्थ्याची आत्महत्या उपमंडलीय पोलीस अधिकारी (CDPO) प्रकाश चंद्र महतो यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितलं की, रामच्या 35 वर्षीय मुलाने बुधवारी रात्री बरकाकानामध्ये त्यांच्या क्वार्टरमध्ये गळा चिरून हत्या केली. त्यांनी सांगितलं की, पोलिसांना गुन्ह्यासाठी वापरला गेलाला चाकू आणि मृतकाचा मोबाइल फोन मिळाला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, राम यांच्या मोठ्या मुलाने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितलं की, त्याला सीसीएलमध्ये अनुकंपा आधारावर नोकरी मिळविण्यासाठी वडिलांची हत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, सीसीएलच्या नियमांनुसार जर सेवादरम्यान कोणा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारशाला नोकरी मिळते.
    Published by:Meenal Gangurde
    First published: