प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी मुलाने बापाला 10 दिवस ठेवले डांबून, पत्नीनेही केली मदत

प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी मुलाने बापाला 10 दिवस ठेवले डांबून, पत्नीनेही केली मदत

कल्याण पूर्वेत पावशेपाडा परिसरात राहणारे सुरेश पावशे हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या नावावर काही लाखांची मालमत्ता आहे.

  • Share this:

कल्याण, 07 डिसेंबर :  प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करण्यासाठी वडिलांना दहा दिवस घरात रस्सीने बांधून कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये (Kalyan) घडला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी, मुलगा, पुतण्या आणि भाच्याला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्वेत पावशेपाडा परिसरात राहणारे सुरेश पावशे हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या नावावर काही लाखांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता आमच्या नावावर करा अशी मागणी पत्नी आणि मुलगा अनेक दिवसांपासून सुरेश यांच्याकडे करीत होते. सुरेश त्यांची वारंवार समजूत काढून त्यांची मागणी टाळत होते.

सुसाट जाणाऱ्या कारनं घेतला पेट, 2 मित्रांनी असा वाचवला जीव, पाहा VIDEO

अखेर प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी पत्नी, मुलगा निखील, पुतण्या स्वप्नील आणि भाचा पुष्कर या चौघांनी मिळून सुरेश यांना घरात रस्सीने बांधले. त्यानंतर घराच्या एका रुममध्ये डांबून ठेवले होते. तब्बल 10 दिवस सुरेश हे बंद खोलीत होते.

अखेर दहा दिवसांनी सुरेश यांनी आपली कशीबशी  सुटका करुन घेतली.  त्यानंतर सुरेश यांनी थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण हकीकत सांगितली.

धक्कादायक प्रकरण! डोक्यावरचं कर्ज हलकं करण्यासाठी स्वतःलाच केलं किडनॅप

कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी सुरेश पावशे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत सुरेश यांची पत्नी, मुलगा निखील, पुतण्या स्वप्नील, भाचा पुष्कर या चौघांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी एस. एस. तडवी यांच्याकडे सोपविला आहे. पोलिसांनी  या चौघांना अटक केली आहे. आज त्यांना दुसऱ्यांदा कोर्टात हजर केले जाणार आहे. 75 ते 80 लाखाच्या मालमत्तेसाठी आपल्या नावावर करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले आहे, असं पोलिसांनी सांगितले आहे.

Published by: sachin Salve
First published: December 7, 2020, 4:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या