कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला बेड्या

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला बेड्या

दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या दुसऱ्या हस्तकलाही मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

वामुंबई, 1 फेब्रुवारी: खंडणीचे रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या दुसऱ्या हस्तकलाही मुंबईतून अटक करण्यात आली आहे. फैयाज नाखुदाला हा एजाज लकडावलाचा दुसरा हस्तक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. 9 जानेवारी रोजी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या मुंबई क्राईम ब्रँचने पाटणा इथून मुसक्या आवळल्या होत्या.

एजाज लकडावला हा खंडणीसाठी फोन करायाचा आणि खंडणीचे पैसे आणण्याचं काम फैयाज नाखुदा करायचा. काही दिवसांआधी सलीम महाराजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. हा एजाजला मोठ्या व्यवसायिकांचे मोबाईल नंबर आणि पत्ते इतर माहिती पुरवायचा.

हेही वाचा-इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर वोडका पार्टी आणि नंतर मित्रानंच केला बलात्कार

कोण आहे एजाज लकडावाला?

भारतात मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेला एजाज लकडावाला अंडवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा माजी हस्तक होता. त्याच्याविरोधात खंडणी, हत्या आणि असेच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दाऊदच्या टोळीतून बाहेर पडल्यानंतर दाऊदचे म्होरकेही त्याच्या मागावर होते.

2003 मध्ये दाऊदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र, तो या हल्ल्यातून बचावला होता. नंतर तो कॅनडामधून आपले खंडणीचे उद्योग करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 25 एकट्या मुंबईतील आहेत. या प्रकरणीच लकडावालाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा-निर्दयीपणाचा कळस! महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून काढला VIDEO

First published: February 1, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या