मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दाम्पत्यामधील खासगी गोष्टी केल्या सार्वजनिक; पत्नीला कोर्टाचा दणका

दाम्पत्यामधील खासगी गोष्टी केल्या सार्वजनिक; पत्नीला कोर्टाचा दणका

आपल्याला लहानशा वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी खूप मोठा परिणाम करू शकतात.

आपल्याला लहानशा वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी खूप मोठा परिणाम करू शकतात.

आपल्याला लहानशा वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी खूप मोठा परिणाम करू शकतात.

  • Published by:  Meenal Gangurde

दुबई, 23 ऑक्टोबर : आपल्या लाइफ पार्टनरच्या (Life Partner) प्रायव्हेसीची (Privacy) काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. अन्यथा याचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. दुबईत (Dubai News) राहणाऱ्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. स्थानिक कोर्टाने या 40 वर्षीय महिलेवर तब्बल 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महिलेने पतीच्या खाजगी गोष्टी सार्वजनिक केल्या (share chat on Social Media) होत्या. महिलेने आपल्या पतीचा फोन नंबर आणि काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यानंतर ही घटना कोर्टात पोहोचली.

‘खलीज टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, पोलिसांना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने शेवटी जानेवारी महिन्यातील पतीसोबत चॅट केलेले काही फोटो इन्टाग्रामवर अपलोड केले होते. ज्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि ही बाब कोर्टापर्यंत पोहोचली. पतीने आरोप केला आहे की, पत्नीच्या या कृत्यामुळे त्याच्या खासगी हक्काचं उल्लंघन (Violation of privacy) झालं आहे. मात्र पत्नीने कोर्टात तिच्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत.

पहिल्यांदा आरोप फेटाळला, त्यांनंतर गुन्हा केला मान्य..

पत्नी आपल्या बचावासाठी म्हणाली की, ती आपल्या फ्लॅटवर होती आणि फोनवर एका अॅपच्या माध्यमातून पतीच्या बहिणींसोबत घटस्फोटात दिल्या जाणाऱ्या पोटगीवर चर्चा करीत होतो. तिला याबद्दल कळलं नाही. दुसरीकडे महिला आणि तिच्या पतीचा घटास्फोटाची केस सुरू आहे. यानंतर पत्नीने कोर्टासमोर स्विकार केला आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर आपल्या मुलांचे फोटो आणि पतीसोबत झालेली चॅट शेअर केली होती.

हे ही वाचा- भयंकर! पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, एक दिवस केला खेळ ‘खलास’

प्रकरण पोहोचलं कोर्टात..

पत्नीने सांगितलं की, तिला माहिती नव्हती की इतक्याा छोटाशी बाब कोर्टापर्यंत पोहोचेल. या प्रकरणात तपास केल्यानंतर कोर्टाने आदेश देत पत्नीवर 41 हजार रुपयांचा दंड लावला. तर पतीच्या पक्षाने दोषी पत्नीविरोधात कडक कारवाईची मागणी केली. पीडित पतीने कोर्टात सांगितलं की, पत्नीच्या या कृत्यामुळे त्याला धक्का बसला आहे. सोबतच त्याच्या गोपनीयतेचंही उल्लंघन झालं आहे. यामुळे पत्नीला कडक शिक्षा व्हायला हवी.

 

First published:

Tags: Wife and husband