Home /News /crime /

मंदिराबाहेर पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; गावकऱ्यांचा विरोध करणं जीवावर बेतलं

मंदिराबाहेर पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; गावकऱ्यांचा विरोध करणं जीवावर बेतलं

पुजाऱ्याने अडवताच त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्यात आलं

    करोली, 9 ऑक्टोबर : जमिनीच्या वादावरुन मंदिराच्या पुजाऱ्याजी हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानातील बुकना या गावी (Bukna Village) मंदिराच्या जमिनीवर दोन पक्षांमध्ये झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून (srinkling petrol) जिवंत जाळण्यात आलं. या प्रकरणानंतर जळालेल्या अवस्थेत पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी या घटनेवरुन तीव्र राग व्यक्त केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च अभिनाय सुरू केलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना बुधवारी सकाळी घडली. मंदिराच्या जागेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कैलास मीणा, शंकर, नमो, रामलखन मीणा आदी छप्पर टाकत होते. यादरम्यान वयस्कर पुजारी बाबूलाल यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. यामध्ये पुजारी गंभीर जखमी झाले. यामध्ये ते खूप भाजले गेले होते. मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण रोखल्यानंतर त्यांनाच जीवे मारण्यात आले. हे ही वाचा-घरात वाहत होता रक्ताचा पाट; आई, वहिनी, भाचीला सुऱ्याने भोसकलं नंतर स्वत:च्याच... अतिक्रमणावरुन सुरू होता वाद अनेक काळापासून मंदिराभोवतीच्या अतिक्रमणावरुन वाद सुरू होता. गावाकऱ्यांनी या प्रकरणात पंचायतदेखील बोलावली होती. यावेळी पंच पटेलांनी मंदिराच्या जमिवीवर कब्जा करणाऱ्यांना अतिक्रमण न करण्याचा इशारा दिला होता. मात्र आरोपींनी त्यांचंही ऐकलं नाही. बुधवारी ते या जमिनीवर छप्पर टाकून कब्जा करू पाहत होते. जेव्हा पुजाऱ्याने विरोध केला तेव्हा त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Rajasthan

    पुढील बातम्या