गर्लफ्रेंडच्या वाढदिवशी सरप्राईजचा होता प्लान; बंगळुरुहून फ्लाइटने पोहोचला तिच्या घरी आणि...

गर्लफ्रेंडच्या वाढदिवशी सरप्राईजचा होता प्लान; बंगळुरुहून फ्लाइटने पोहोचला तिच्या घरी आणि...

गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा झाला पोलीस ठाण्यात...

  • Share this:

लखीमपुर, 12 जानेवारी :  उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरीमध्ये एक मुस्ली तरुण बंगळुरुहून फ्लाइट घेऊन एका हिंदू मुलीला भेटण्यासाठी आला. त्यानंतर मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला सळो की पळो करुन सोडलं. मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला मारत मारतच पोलीस ठाण्यात घेऊन गेले. येथे रात्रभर त्याला पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं. स्थानिक हिंदूवादी संघटनेकडून या प्रकरणात धर्म परिवर्तन विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी रविवारी तरुणाला ताब्यात घेतलं आहे व सोमवारी त्याला सोडण्यात आलं. (surprise the online girlfriends birthday)

सांगितलं जात आहे की, 21 वर्षीय हा तरुण बंगळुरुत इंजिनिअर आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो लखीमपुरच्या एका मुलीसोबत ऑनलाइन भेटला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद सुरू होता. ज्या दिवशी तो मुलीला भेटायला आला त्यादिवशी तिचा वाढदिवस होता. तरुणीच्या वाढदिवसासाठी त्याने फ्लाइटचं तिकीट बुक केलं. एक सॉफ्ट टॉय, चॉकलेट आणि मिठाई घेऊन तो लखनऊला पोहोचला. जेव्हा तो तरुणीच्या घरी पोहोचला आणि तिच्या कुटुंबीयांना नेमका प्रकार समजला तर सर्वजण जमा झाले. यावेळी शेजारच्यांबरोबरच हिंदूवादी संघटनेचे लोक जमा झाले. (surprise the online girlfriends birthday)

हे ही वाचा-यासीन मलिकच्या अडचणीत वाढ; 31 वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर पुन्हा चालणार खटला

सांगितलं जात आहे की, या लोकांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोणीतरी पोलिसांना फोन केला. जमलेल्या लोकांनी या प्रकरणात धर्म परिवर्तनाची केस दाखल करण्यावर जोर दिला. ठाण्यातील एसएचओ सुनील कुमार यांनी सांगितलं की, जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं, तेव्हा त्याच्याजवळ 1500 रुपये आणि तिकीट होतं. त्यांनी सांगितलं की, तो देवरियाचा आहे आणि तरुणीला भेटायला आला होता. एसएचओ यांनी सांगितलं की, मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांना तरुणीकडून धोका आहे.  (surprise the online girlfriends birthday) मात्र त्यांना गुन्हा दाखल करायची नाही. मात्र या प्रकरणात हिंदूवादी संघटनांनी तक्रारी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएचओने पुढे सांगितलं की, रात्र झाल्याकारणाने त्याला ठाण्यात ठेवण्यात आलं आणि सोमवारी कोर्टाने त्यांची सुटका केली.

Published by: Meenal Gangurde
First published: January 12, 2021, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading