नागपूर, 12 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील गांधीसागर तलावात एका नवजात बाळाचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. जगात येऊन अवघे काही तास झालेल्या या बाळाला तलावात फेकून दिले होते.
उमरेड येथील गांधीसागर तलावात आज दुपारी एका नवजात बाळाचा मृतदेह तरंग असल्याचे आढळून आले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तलावाच्या किनाऱ्याला या नवजात अर्भकाचा मृतदेह पाहून उपस्थित लोकांच्या काळजात धस्स झालं.
या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नवजात बाळाचे मृतदेह ताब्यात घेतले.
हे नवजात बाळ तलावात कुणी टाकले हे अद्याप कळू शकले नाही. हे नवजात बाळ कुणाचे आहे आणि कुणी त्याला तलावात फेकून दिले याचा पोलीस शोध घेत आहे. नवजात बाळाच्या आईचा उमरेड पोलीस शोध घेत आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.
कारची दुचाकीला धडक, 1 ठार
दरम्यान, नागपूर-अमरावती रोडवर भरधाव कारने दुचारीस्वाराला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
नागपूर अमरावती रोडवरील वाडी परिसरातील सेवा मारुती शोरूम समोरची 10 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. या अपघातात संतोष भोंगाडे (वय 40 )यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.