बीड, 05 जानेवारी : खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात, हातावर कत्तीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना बीड (beed) जिल्ह्यातील घाट नांदूर परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पुतण्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्धन मुंजाजी धोंगडे असं व्यक्तीचे नाव आहे तर अर्जुन दत्तात्रय धोंगडे असं हल्ला करणाऱ्या पुतण्याचं नाव आहे.
हॉटेलमधील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह! तीन टीमना धोका, BCCI चं टेन्शन वाढलं
खर्चासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून अर्जुनने चुलत्याच्या अंगावर कत्तीने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी वैशाली धोंगडे हिने प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान जनार्धन यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे अंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुतण्या अर्जुन धोंगडे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्याच्या भावाच्या डोक्यात घातला कोयता
दरम्यान, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलत भाऊ शेखर पारगे याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात होऊन हा जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचे हवेली पोलिसांकडून सांगण्यात आले.
Corona vaccine ची प्रतीक्षा अखेर संपली! सरकारनं जारी केली कोरोना लसीकरणाची तारीख
या प्रकरणी हवेली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी मधील जिव्हाळा फार्महाऊसवर शेखर पारगे आपल्या मित्रांसह मद्यपान करत बसले होते. त्याच हॉटेलमध्ये डोणजे येथील काही तरुण मद्यपान व जेवणासाठी बसले होते. मध्यरात्रीनंतर शेखर पारगे आणि इतर तरुणांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. राग अनावर झाल्यावर शाकीर शेख, सज्जद शेख व इतर दोघांनी डोणजे येथे जाऊन कोयते व सत्तुर घेऊन येत शेखर पारगे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शेखर पारगे याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शेखर पारगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला झाल्यापासून चारही हल्लेखोर फरार झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.