मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दुर्देवी! प्रियकरासाठी आईची माया आटली; पोटच्या 12 वर्षांच्या लेकाला दिली भयावह वागणूक

दुर्देवी! प्रियकरासाठी आईची माया आटली; पोटच्या 12 वर्षांच्या लेकाला दिली भयावह वागणूक

आईच्या प्रेमसंबंधाविषयी कळल्यानंतर मुलाला धक्काच बसला होता. त्यानंतर त्याला अत्यंत क्रूर वागणूक देण्यात आली.

आईच्या प्रेमसंबंधाविषयी कळल्यानंतर मुलाला धक्काच बसला होता. त्यानंतर त्याला अत्यंत क्रूर वागणूक देण्यात आली.

आईच्या प्रेमसंबंधाविषयी कळल्यानंतर मुलाला धक्काच बसला होता. त्यानंतर त्याला अत्यंत क्रूर वागणूक देण्यात आली.

चेन्नई, 10 सप्टेंबर : आई कधीच आपल्या मुलासोबत वाईट वागू शकत नाही, असं म्हटलं जातं. मात्र तमिलनाडूमधून (Tamil Nadu) एक विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसाक, कुड्डालोर (Cuddalore) जिल्ह्यातील एका गावात आईवर तिच्या प्रियकरासोबत मिळून (Lover) आपल्या 12 वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी महिलेने आपल्या मुलावर गरम लोखंडाच्या पाईपने हल्ला केला. शेजारील एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर याबाबत चाइल्डलाइन (Child Helpline) ला माहिती दिली. त्यानंतर याचा खुलासा झाला. (The mother was giving horrible treatment to her 12 year old son along with her boyfriend)

मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय आई आणि तिचा 40 वर्षांचा प्रियकर मुलाला नेहमी मारहाण करीत होते. एकेदिवशी त्या मुलाने आईला त्याचे प्रियकरासोबत असलेल्या संबंधावरुन सवाल उपस्थित केला. त्यानंतर दोघांनी लोखंडाच्या पाईपने मुलावर बल्ला केला.  याबाबत सूचना मिळताच चाइल्डलाइन आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

हे ही वाचा-Weird News: लग्नाच्या 16 वर्षांनंतर पतीचं गूढ आलं समोर, पत्नीला बसला जबर धक्का

पतीचा झाला मृत्यू

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, या दोन्ही आरोपींची नावे शांति देवी आणि तिचा प्रियकर एम धुगेयाल अहमद आहेत. दोन वर्षांपूर्वी शांतीचे पती हरिकृष्णन यांचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. ज्यानंतर ती अहमदच्या संपर्कात आली. धुगेलालने सांगितलं की, महिलेच्या घरात वाईट शक्ती वास करीत आहेत. यावर तो म्हणाला की घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तो घरात काही पूजा विधी करेल. यानंतर दोघांचं नातं प्रेमात बदललं.

मुलाने केला होता आईच्या संबंधावर सवाल

आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलाने आईमध्ये झालेला बदल पाहिला होता. यावर त्याने अहमदसोबत तिच्या असलेल्या संबंधांवर सवाल उपस्थित केले. यामुळे नाराज महिला आणि अहमदने मुलाला त्रास द्यायला सुरुवात केली. ते दोघेही मुलाला त्रास देत होते. एकेदिवशी त्यांनी मुलाला रात्रभर घराबाहेर ठेवलं होतं. याबाबत शेजारचेही काहीच बोलू शकत नव्हते कारण त्यांनी त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका स्थानिकाने याबाबत ग्राम प्रशासकीय अधिकारी आणि चाइल्डलाइनला यांना माहिती दिली. यानंतर अल्पवयीन मुलाला वाचविण्यात यश आलं.

First published:
top videos

    Tags: Crime, Mother, Tamilnadu