CCTV VIDEO: मातृत्वाला काळीमा! 3 वर्षांच्या चिमुकलीला ट्रेनखाली फेकलं आणि...

3 वर्षांच्या चिमुकलीला ट्रेनखाली फेकणाऱ्या निर्दयी आईचा CCTV VIDEO व्हायरल.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 01:58 PM IST

CCTV VIDEO: मातृत्वाला काळीमा! 3 वर्षांच्या चिमुकलीला ट्रेनखाली फेकलं आणि...

अजमेर, 31 ऑक्टोबर: मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वर्षांच्या चिमुकलीला ट्रेनखाली टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार राजस्थामधील अजमेर इथल्या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 18 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता मात्र त्याचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात न तू वैरीणी, आईनेच चक्क पोटच्या गोळ्याला रेल्वे स्थानकांत थांबलेल्या एक्स्प्रेसखाली कापडात गुंडाळून टाकून दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रेल्वे ट्रॅकवर ह्या महिलेनं कसं चिमुकलीला फेकून दिलं. महिलेनं चिमुकलीभोवती गुंडाळलेलं कापड लगबगीनं उचललं आणि निघून गेली. त्यानंतर या आईनं आपल्या काळजाचा तुकडा जिंवत आहे की नाही हे पाहण्यासाठी एकदा मागे वळूनही पाहिलं नाही. महिला तशीच लगबगीनं आपली पिशवी उचलून निघून गेली. रेल्वे ट्रॅकवरून रडण्याचा आवाज ऐकू येताच स्थानिकांनी रेल्वे सुरक्षा रक्षाकांना माहिती दिली. रेल्वे सुरक्षा रक्षक आणि प्रवाशांच्या मदतीनं चिमुकलीला ट्रेनखालून बाहेर काढण्यात यश आलं. तिचा जीव वाचवला मात्र या महिलेला स्थानिकांनी पकडण्याआधीच महिला रेल्वे स्थानकातून फरार झाली. जर वेळीच पोलीस सुरक्षा रक्षक आणि प्रवाशांनी या चिमुकलीचे प्राण वाचवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

Loading...

आईवर अशी पोटच्या गोळ्याचा बळी घेण्याची वेळ का आली? या चिमुकलीचा काय दोष होता? महिलेनं असं का केलं? या निष्ठूर दगडाचं काळीज असलेल्या महिलेनं असं पाऊल का उचललं? य़ाबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकली नाही. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीनं या महिलेचा तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rajsthan
First Published: Oct 31, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...