रक्ताच पाणी करुन ज्याला वाढवलं त्याच लेकराचा आईने कुऱ्हाडीने कापला गळा; मुलाला मारलं कारण...

रक्ताच पाणी करुन ज्याला वाढवलं त्याच लेकराचा आईने कुऱ्हाडीने कापला गळा; मुलाला मारलं कारण...

मुलाची हत्या केल्यानंतर आईने धावत जाऊन पतीला सांगितले की...

  • Share this:

पन्ना, 22 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एका आईने आपल्या तरुण मुलाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्याच मुलाचा अत्यंत क्रुरपणे आईने जीव घेतला. यामागील कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल. या आईने देवीला खूश करण्यासाठी गाठ झोपलेल्या मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. ही खळबळजनक घटना पन्ना जिल्ह्यातील कोतवाली पोलीस हद्दीत कोहनी गावात घडली आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. याशिवाय येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून आईची मानसिक अवस्था खालावलेली

पन्ना पोलीस ठाण्याचे प्रभावी अरुण सोनी यांनी सांगितले की, साधारण सायंकाळी साडेचार वाजता पोलिसांना याबाबत सूचना मिळाली होती. कोहनी गावात एका  50 वर्षीय महिला सुनिया बाई लोधी यांनी स्वत:चा मुलगा द्वारका लोधीच्या गळावर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. त्यांनी सांगितले की, सुनिता बाईला साधारण गेल्या दोन वर्षांपासून दैवीय शक्ती मिळाल्याचा भास होत होता. (काहींच्या मते तिच्या अंगात देवी येत होती) अशाच परिस्थितीत तिने कुऱ्हाडीने मुलगा द्वारका लोधी याच्या गळ्यावर वार केले व यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-मास्कबाबत तपासणी करत असतानाच झाला दुसऱ्याच गुन्ह्याचा भांडाफोड, ठाण्यातील घटना

महिलेची चौकशी

सोनी यांनी सांगितले की, कायदेशीर कारवाई करीत मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे. ते म्हणाले की, आरोपी महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे आणि तिची चौकशी सुरू आहे. हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही ताब्यात घेण्यात आली आहे. जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही देवीला मुलाचा बळी का चढवला, यावर ती म्हणाली..सुरुवातीला देवी माझ्या अंगात येत होती त्यातूनच हे झालं...ही महिला कायम याला मारायचंय..त्याला मारायचं असंच बोलत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

झोपलेल्या मुलाची मान कापली

सोनी यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सविस्तर तपास सुरू आहे. यादरम्यान कोहनी गावात राम भगत यांनी माध्यमांना सांगितले की, सुनिया बाई हिने आपल्या मुलाला मारुन टाकलं. तिच्या अंगात देवी यायची आणि म्हणायची की..मी बळी घेणार...तिने मुलगा रात्रीत झोपेत असताना त्याची हत्या केली. यापुढे ते म्हणाले की, हत्या झाली यावेळी घरात सुनिया बाई, तिचा पती आणि मुलगा होता. तिचा मुलगा व पती झोपले होते. रात्री सुनिया बाई हिने कुऱ्हाड आणली आणि मुलावर वार केले. यानंतर मी पतीकडे गेली व त्याला म्हणाली..मी माझं काम केलं आहे. बळी घेतलीये..मुलाला मारुन टाकलय तुम्ही जाऊन पाहा.

Published by: Meenal Gangurde
First published: October 22, 2020, 5:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading