मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलीची छेड काढणाऱ्या live in पार्टनरला आईने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; आधी दिली प्रेमाची शपथ

मुलीची छेड काढणाऱ्या live in पार्टनरला आईने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; आधी दिली प्रेमाची शपथ

आधी महिलेने तरुणाला प्रेमाची शपथ दिली आणि...

आधी महिलेने तरुणाला प्रेमाची शपथ दिली आणि...

आधी महिलेने तरुणाला प्रेमाची शपथ दिली आणि...

  • Published by:  Meenal Gangurde

फरीदाबाद, 29 ऑक्टोबर : सेक्टर-75 भागात 17 ऑक्टोबर रोजी अर्धवट जळालेला मृतदेह कोणी परदेशी व्यक्तीचा नसून तर बल्लभगड (Faridabad Crime News) भागात राहणाऱ्या तरुणाचा आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, पवन एका विवाहित महिलेसह 2 वर्षांपासून लिव्हइन रिलेशनशीपमध्ये (Live in Relation) राहत होता. यादरम्यान पवनने महिलेच्या 14 वर्षीय मुलीसोबत छेडछाड केली. ज्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यांच्यातील वाद इतका वाढला की, महिलेने पेट्रोल टाकून पवनला जिवंत जाळलं. सेक्टर65 क्राइम ब्रांचने या प्रकरणात आरोपी महिलेला अटक केली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर लिव्हइनमध्ये राहत होती महिला...

पंजाबमधील पठाणकोटमध्ये 2 मुलींसोबत राहणाऱ्या महिलेचा पती फरीदाबादमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. 2019 मध्ये पतीचा रक्ताच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. पतीच्या जागी पत्नीला फरीदाबादमधील कंपनीत नोकरी मिळाली. येथे आवल्यानंतर महिलेची ओळख कंपनीतील पवन नावाच्या तरुणासोबत झाली. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2019 मध्ये दोघे लिव्ह-इनमध्ये राहू लाहले. महिलेच्या दोन्ही मुली पंजाबमध्येच राहत होत्या. यादरम्यान महिलेने आरोप केला की, तिच्या 14 वर्षीय मुलीसोबत पवनने छेडछाड केली. मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितलं. यानंतर पवन आणि महिलेत वाद झाला. दररोज वाढत असलेल्या वादामुळे महिला संतप्त झाली. आणि तिने पवनला मारण्याचा कट रचला.

हे ही वाचा-भयंकर! YouTube Video पाहून 17 वर्षांच्या मुलीने घरातच केली स्वत:ची डिलिव्हरी

माझ्यासाठी काय करू शकतोस विचारलं आणि...

पवनकडे कार होती, महिला पवनला 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीला घेऊन गेली. येथे तिने आपल्या नातेवाईकांना बोलावून कार घरी घेऊन जाण्यास सांगितलं. तिने सांगितलं की, ते हॉटेलमध्ये थांबून येतील. मात्र ते हॉटेलमध्ये थांबले नाहीत. तब्बल 15 दिवसांपूर्वी महिलेने बल्लभगडमधून 2 लीटर पेट्रोल आणि झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या. महिला पवनला म्हणाली की, माझ्यासाठी काय करू शकतोस? यावर पवन म्हणाला की, तो काहीही करू शकतो. महिला  झोपेच्या गोळ्या देऊन म्हणाली की हे खाऊन दाखव. पवनने गोळ्या खाल्ल्या आणि तो बेशुद्ध झाला.

रिक्षात बसून निर्जन ठिकाणी गेली घेऊन..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने दिल्लीहून ऑटो भाड्याने घेऊन फरीदाबाद येथे गेली आणि त्याची हत्या केली. येथे महिलेने पवनवर पेट्रोल शिंपडलं आग लावली. 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. हा मृतदेह नायजेरियन व्यक्तीचा असल्याचं पोलिसांना वाटत होतं, मात्र यामागे मोठा कांड समोर आला.

First published:

Tags: Crime news, Murder