Home /News /crime /

मुलीच्या लग्नाच्या अडथळा ठरेल म्हणून आईने काढला प्रियकराचा काटा

मुलीच्या लग्नाच्या अडथळा ठरेल म्हणून आईने काढला प्रियकराचा काटा

इगतपुरी तालुक्यातील ओंडली शिवारात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या बेवारस मृतदेह आढळून आला होता.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी इगतपुरी, 15 जून : मुलीच्या लग्नात अडथळा ठरू शकतो, या भीतीने एका आईने आपल्या मुलीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील ओंडली शिवारात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या बेवारस मृतदेह आढळून आला होता. अखेर या मृतदेहाचा उलगडा करण्यात घोटी पोलिसांना अवघ्या काही तासांतच यश आले आहे. सदर युवकाची त्याच्या प्रेयसीच्या लग्नात अडथळा ठरेल या भीतीने प्रेयसीच्या आईने दोन इसमाच्या मदतीने हत्या करून त्याचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला होता. मुंबईत आणखी एका तरुणाच्या आत्महत्येमुळे खळबळ, भाऊ घरात असताना घेतला गळफास याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील तळेगाव जवळील कातोरवाडी येथील पंडित ढवळू खडके याचे चांगुणाबाई गणपत मेंगाळची मुलगी सकुला हिच्याशी प्रेमसंबंध होते. तसंच पंडित खडके  यांनी या मुलीला लग्नाची मागणीही घातली होती. मात्र, सकुलाच्या घरच्यांनी ही मागणी अमान्य करीत तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमवले होते. दरम्यान, या लग्नात पंडित हा विघ्न आणेल आणि अडथळा निर्माण करील अशी सकुलाच्या आईला भीती होती. या भीतीपोटी चांगुणाबाई हिने मोखाडा तालुक्यातील बोटोसी येथील पहिल्या पतीचा मुलगा विलास प्रथम गावंडा याच्यासह एक अज्ञात इसमाच्या मदतीने पंडित खडके याची हत्या करून त्याचा मृतदेह ओंडली शिवारात निर्जनस्थळी फेकून दिला. अखेर मुंबई लोकल सुरू झाली, रेल्वे मंत्र्यांनी केलं जाहीर दरम्यान, सदर युवक बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला आणि इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मात्र, ओंडली शिवारात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह हवालदार सुहास गोसावी,शीतल गायकवाड यांनी सखोल तपास करीत सदर युवकाच्या खुनाचा उलगडा केला. या प्रकरणी घोटी पोलिसांनी मयत युवकाच्या प्रेयसीच्या आईसह एका इसमाला अटक केली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या