Home /News /crime /

सासूचा 15 वर्षांनी लहान जावयावर जडला जीव; साथ अशक्य...राहत्या घरात धक्कादायक कृत्य

सासूचा 15 वर्षांनी लहान जावयावर जडला जीव; साथ अशक्य...राहत्या घरात धक्कादायक कृत्य

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    जयपूर, 28 जून : राजस्थानमधील (Rajasthan News) बाडमेर जिल्ह्यात पुन्हा एकदा सामूहित आत्महत्येच्या (Mass suicide) मोठ्या घटनेने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणात 40 वर्षीय महिलेने आपल्या 25 वर्षांच्या जावयासह गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होतं.  (Mother-in-law fell in love with son-in-law). यातूनच दोघांनी आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंगेरा फाटाजवळ सोमवारी रात्री हा प्रकार घडला. सासू आणि जावयाने एकत्र गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. घरासमोरून जाणाऱ्या वाहन चालकाने खिडकीतून लटकलेला मृतदेह पाहिला होता. यानंतर गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. यादरम्यान गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. मुलीचं एक वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न... जावयाचं एक वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येमागील तपास सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील बाडमेर जिल्हा सुसाइड कॅपिटल होत चालला आहे. येथे आत्महत्या आणि सामूहिक आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या सर्व घटनांमुळे पोलीस प्रशासनाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या