Home /News /crime /

6 वर्षांच्या मुलीसह आई मुलांचा सडलेला अवस्थेत आढळला मृतदेह, भिवंडीतील धक्कादायक घटना

6 वर्षांच्या मुलीसह आई मुलांचा सडलेला अवस्थेत आढळला मृतदेह, भिवंडीतील धक्कादायक घटना

दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत भिवंडी तालुक्यातील उबंरखांड पाच्छापूर जंगलात आढळले आहे.

भिवंडी, 11 डिसेंबर : भिवंडीमध्ये (Bhiwandi) एका आईसह तीन मुलांचा मृतदेह झाडावर सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आईसह मुलांच्या मृत्यूनंतर वडिलानेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत भिवंडी तालुक्यातील उबंरखांड पाच्छापूर जंगलात आढळले  आहे. पत्नी रंजना (वय 30) ,मुलगी दर्शना (वय 12), रोहिणी (वय 6) आणि मुलगा रोहित (वय 6) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. तर वडील श्रीपत बच्चू बांगरी याने आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. JEE Main 2021: परीक्षापद्धतीत 'हे' बदल करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 21 ऑक्टोबर रोजी चौघे बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. भिवंडीत दरोडा टाकून दीड कोटींचे दागिने लुटले दरम्यान, भिवंडी तालुक्यातील मौजे टेंभवली गावात गुरुवारी रात्री  उघडकीस आली आहे. गावात राहणारे वीटभट्टी उद्योजक दिपक परशुराम बाबरे यांच्या घरी ही घटना घडली आहे. त्याचा राग रानगव्यास मारून काढला काय? सेनेनं चंद्रकांत पाटलांना डिवचले आज पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचे 3 किलो वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड कपाट फोडून चोरून नेले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाबरे कुटुंबीय घराच्या प्रवेशद्वाराला व घराला कुलूप लावून मुलीला सासरी पनवेल येथे सोडण्यासाठी गेले होते. ते घरी आल्यानंतर गेटच्या व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यानंतर  घरातील लाकडी कपाट तपासून बघितले असता कपाटाचे कुलूप देखील फोडलेले आढळून आले. त्यामुळे कपाटाची तपासणी केली असता कपाटातील 3 किलो सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या