Home /News /crime /

11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला? प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास

11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला? प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, CBI कडे सोपवला तपास

11 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जनेश्वरी एक्सप्रेससोबत एक मोठी दुर्घटना (Train Accident) घडली होती. यात मृत घोषित करणारा एक व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आलं आहे.

    कोलकाता 21 जून: रेल्वे विभागासोबत जोडलेलं एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. 2010 साली म्हणजेच जवळपास 11 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जनेश्वरी एक्सप्रेससोबत एक मोठी दुर्घटना (Train Accident) घडली होती. यात मृत घोषित करणारा एक व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आलं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या व्यक्तीला कुटुंबीयांनीच मृत घोषित केलं होतं आणि याचाच फायदा घेत त्यांनी सरकारी नोकरी (Government Job) आणि आर्थिक भरपाई घेतली होती. आता तब्बल अकरा वर्षांनंतर या गोष्टीचा खुलासा झाला आहे, की ज्या मृत व्यक्तीच्या नावावर कुटुंबीयांनी हे सर्व फायदे घेतले, तो व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. आता ही बाब समोर आल्यानंतर या घटनेमुळे सरकारी नोकरी मिळालेली कथित मृताची बहिण आणि त्याच्या वडिलांना सीबीआयनं चौकशीसाठी बोलावलं आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, भाव नसल्याने शेतात सोडल्या शेळ्या-मेंढ्या, VIDEO मे 2010 मध्ये झालेल्या त्या घटनेत 148 लोकांचा मृत्यू झाला होता. हावड़ा-मुंबई जनेश्वरी एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरुन खाली घसरले होते. यानंतर झारग्रामजवळ मालवाहतूक रेल्वेसोबत झालेल्या धडकेत मोठी दुर्घटना झाली होती. याच घटनेनंतर एका व्यक्तीनं असा दावा केला होता, की या अपघातात त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी डीएनए सँपलचाही आधार घेण्यात आला होता. भारतीय सैन्य- दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर- ए-तोयबाचा कंमाडर ठार रेल्वेनं आपल्या नियमानुसार, मृताच्या कुटुंबीयातील सदस्याला नोकरी देत आर्थिक मदतही दिली. या व्यक्तीच्या बहिणीला रेल्वेमध्ये सिग्नल डिपार्टमेंटमध्ये नोकरीही देण्यात आली. मात्र, नुकतंच अशी तक्रार दाखल झाली, की मृत घोषित करण्यात आलेला व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत आहे. यानंतर रेल्वेनं प्रकरणाचा तपास सुरू केला आणि यानंतर संपूर्ण सत्य समोर आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Train accident, West bengal

    पुढील बातम्या