तोंडात बोळा कोंबून लाटण्याने पतीचा घेतला जीव; दिराला फोन करुन म्हणाली, 'आता या...'

तोंडात बोळा कोंबून लाटण्याने पतीचा घेतला जीव; दिराला फोन करुन म्हणाली, 'आता या...'

पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाव घेतली तेव्हा लाटणं रक्ताळलेल्या स्थितीत मृतदेहाशेजारी पडले होते

  • Share this:

सोनापत, 1  डिसेंबर: हरियाणाच्या (Hariyana) सोनीपत जिल्ह्यातील बांदे पुर गावात पत्नीने (wife) लाटण्याने मारून आपल्या पतीची हत्या केली. या घटनेत महिलेच्या प्रियकराने तिला साथ दिली. हत्या केल्यानंतर महिलेने दिराला फोन करुन भावाची हत्या केल्याचे सांगितले. घटनास्थळावर महिलेचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला. घटनेनंतर त्या व्यक्तीची पत्नी व प्रियकर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

हरियाणाच्या सोनीपत बांदे पुर गावात राहणारे नरेंद्र हे राठधना रोडवरील गॅस एजन्सीमध्ये काम करीत होते. 22 वर्षांपूर्वी त्याचं लग्न पिपली खेडा गावातील रहिवासी रेखाशी झाला होता. नरेंद्र यांना दोन मुलं आहेत. सांगितले जात आहे की, पती-पत्नीमधील नात्यात दुरावा आला होता. एक वर्षापूर्वीपर्यंत रेखा आपला प्रियकर सोमवीरसोबत राहत होती. तीन महिन्यांपूर्वी ती आपल्या पतीकडे पुन्हा आली. यादरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला. ज्यानंतर पंचायतही झाली. पंचायतने दोघांमधील वाद सामंजस्याने सोडविण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा-धक्कादायक! चुलत बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्याला विरोध केल्यामुळे केला गोळीबार

नरेंद्रच्या भावाने सांगितलं की, तिला भावाच्या मोबाइलवरुन फोन आला होता. ज्यावर रेखा वहिणी आणि सोमवीरने सांगितलं की, नरेंद्रला मार्गी लावलयं. फोनवर मिळालेल्या या माहितीनुसार सोनू आणि अन्य कुटुंबीयांसह नरेंद्रच्या घरी पोहोचले. यावेळी नरेंद्रचे शव रक्ताळलेल्या अवस्थेत पडले होते. याबाबत तातडीने पोलिसांनी बोलावण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन लाटणं जप्त केलं आहे. त्याचं तोंड कपड्याने बांधण्यात आले. घरात रेखा आणि तिची दोन्ही मुलं नव्हती. सदर ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितलं की, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत व्यक्तीच्या भावाने सांगितलं की, त्याला फोनवरुन त्याची वहिनी आणि तिच्या प्रियकरांने याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरुन रक्ताळलेल्या अवस्थेत नरेंद्रचा मृतदेह सापडला आणि त्याच्याजवळच रक्ताने माखलेलं लाटणं पडलेलं होतं. लाटण्याने त्याच्या डोक्यावर वारंवार प्रहार करून त्याला मारण्यात आलं.

Published by: Meenal Gangurde
First published: December 1, 2020, 7:28 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading