लखनऊ, 24 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बलिया जिल्ह्यातील बांसडीह रोड भागात पीपरपाती गावात सोमवारी नवविवाहिताचा मृतदेह गळफास (Suicide) घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दार तोडून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (The husband stop talking after disputes, Wife ends life in 2 months of marriage) मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय खुशबूचं लग्न दोन महिन्यांपूर्वी 26 नोव्हेंबर रोजी पीपरपाती निवासी बरमेश्वर नाथ ओझासोबत झालं होतं. लग्नानंतर सासरी आल्यानंतर खुशबूला खुप मनस्ताप सहन करावा लागत होता. तिचा पती काहीतरी कारण सांगून तिच्यासोबत भांडण करीत होता. रविवारीदेखील पती-पत्नीमध्ये असाच वाद झाला होता. हे ही वाचा-भयंकर! अनैतिक संबंधाचा झाला रक्तरंजित शेवट, हिंगोलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या भांडण झाल्यानंतर पती दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेला. सकाळी जेव्हा कुटुंबीय खुशबूला उठवण्यासाठी खोलीबाहेर आले तर आतून काहीच आवाज आला नाही. यानंतर त्यांनी खोलीत डोकावून पाहिलं तर खुशबूचा मृतदेह खोलीच्या आत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यांनी दार तोडून खुशबूचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी सांगितलं की, या घटनेचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Suicide, Uttar pradesh news