Home /News /crime /

विकृत नवऱ्याने गावभर लावले स्वत:च्या बायकोचे पोस्टर्स; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

विकृत नवऱ्याने गावभर लावले स्वत:च्या बायकोचे पोस्टर्स; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

इतकचं नाही तर नवऱ्याने बायकोची बहीण आणि सासूचे पोस्टर्स लावण्याची धमकी दिली आहे.

    राहुल खंदारे/ बुलढाणा, 13 मार्च : पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी पत्नीचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिखली तालुक्यात घडली असून याबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The husband put up posters of his wife all over the village) बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात विकृत नवऱ्याने बायको घटस्फोट देत नसल्याने चक्क सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्याच बायकोचे पोस्टर्स लावून त्यावर "गरज पडल्यास संपर्क साधा" असं लिहित काही मोबाईल क्रमांकही दिले आहेत. समाधान निकाळजे नामक आरोपीने हा प्रताप केला असून महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसात आरोपी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (The husband put up posters of his wife all over the village) हे ही वाचा-Free Fire गेम खेळताना झालं प्रेम, प्रियकरासोबत लग्नही केलं, सासुरवाडीत जाताच... या प्रकरणी महिलेच्या भावाने या आरोपीसोबत फोनवर चर्चा केली असता चिखली तालुक्यात आरोपीने पोस्टर्स लावले असल्याची माहिती आहे. घटस्फोट नाही दिला तर बायकोची बहीण व सासूचे सुद्धा पोस्टर्स लावून बदनामी करण्याची धमकी या विकृत आरोपीने दिली आहे. पतीने उचललेल्या या पावलामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे पत्नीचे पोस्टर लावून त्याखाली नंबर लिहिणे चुकीचे आहे. हा विकृत माणूस इथवरचं थांबला नाही. तर घटस्फोट दिला नाही तर पत्नीची बहीण आणि सासूचे सुद्धा पोस्टर्स लावून बदनामी करीन, अशी धमकी त्याने दिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या