मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Love Marriageकरून पत्नीला ढकललं वेश्याव्यवसायात, नकार देताच जिवंत जाळलं

Love Marriageकरून पत्नीला ढकललं वेश्याव्यवसायात, नकार देताच जिवंत जाळलं

  पाटना 21 जून: बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातल्या बहादूरपूर गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आलीय. प्रेमाच्या जाळ्यात फसवून एका डान्सरने एका डान्सर असलेल्या तरुणीशी लग्न केलं. सुखी संसाराची तिला गुलाबी स्वप्न दाखवली. मात्र लग्नानंतर त्याचं खरं रुप उघडकीस आलं. त्याने आणि त्याच्या मित्रांनी तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणला आणि तिने नकार देताच तिला जिंवत जाळल्याची संतापजनक घटना घडली.

  पीडीत तरुणी ही पश्चिम बंगालमध्ये राहणारी होती आणि गुलाब नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. दोघेही एका डान्स ग्रुपमध्ये काम करत होते. त्यात दोघांचं प्रेम झालं आणि नंतर त्यांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर गुलाबचं खरं रुप बाहेर आलं. पैसे आणि चैनीसाठी तो त्याच्या पत्नीवरच वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणू लागला. त्यातून त्यांच्यात भांडणही होत असे.

  या प्रकारात गुलाबसोबत त्याचे तीन मित्रही सहभागी होते. एकदा हे तिघे आणि पीडीत तरुणीमध्ये भांडण झालं. त्यांनी तिला मारहाण केली ती अत्यावस्थ असतानाच त्या तिघांनी तिला घरातच जाळून टाकलं. त्याचा धूर जेव्हा शेजाऱ्यांना दिसला तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

  हे वाचा -

  कोरोना पॉझिटिव्ह सांगून क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून तरुणीसोबत केलं भलतंच

  शौचालयात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरलेल्या बापलेकाचा करुण अंत

  संपादन - अजय कौटिकवार

   

   

  First published:
  top videos