फिल्लोर, 1 डिसेंबर : फिल्लोर या भागातील आश्रमातील बाबाचा एक अश्लिल व्हिडीओ (Pornographic video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्वयंघोषित बाबाने एका अल्पवयीन मुलीसह आश्रमाच्या आत अश्लिल कृत्य करीत असल्याचं दिसून आलं. या लज्जास्पद घटनेनंतर (Crime News) बाबाच्या पत्नीने सांगतलं की, व्हिडीओमध्ये दाखविला जाणारा बाब तिचा पती आहे. तो फिल्लोर गावातील एका धार्मिक आश्रमाचा प्रमुख आहे. तिने सांगितलं की, महिलेने पतीविरोधात लिखित तक्रार केली आहे. ज्यात तिने पतीचं दुष्कृत्यासह त्याने तिच्यासोबत केलेल्या अमानवीय व्यवहाराबद्दलही उल्लेख केला आहे. याशिवाय त्याने पतीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
यावेळी बाबाच्या सासूने सांगितलं की, व्हिडीओमध्ये बाबा अल्पवयीन मुलीसोबत दिसत आहे. तिनेही बाबाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय गावाचे पंचायत सदस्य आणि ज्येष्ठांनीही बाबांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा-दिवसभर वर्गात उपस्थित राहिला पण रात्री आढळला मृतावस्थेत; शाळेतच झाला शेवट
दुसरीकडे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाबाचे वस्त्र घातलेल्या व्यक्तीने स्वत:वर केलेले आरोप चुकीचं असल्याचं सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून त्यांनी या व्हिडीओचा तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनाही बोलवण्यात आलं आहे. त्यांच्या जबाबानंतर आरोपीवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात तपास केला जात आहे आणि तपासाच्या आधारावर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news