Home /News /crime /

'तू माझं लग्न का होऊ देत नाहीस', म्हणत मरेपर्यंत आजीला काठीने मारत राहिला..

'तू माझं लग्न का होऊ देत नाहीस', म्हणत मरेपर्यंत आजीला काठीने मारत राहिला..

25 वर्षीय तरुणाने अत्यंत क्रूरपणे आपल्या आजीची हत्या केली. कारण समोर आल्यानंतर सर्वजण हादरले.

    Grandson killed grandmother in Solapur: सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातून एक अत्यंत हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका नातवाने वारंवार मुलींची स्थळं नाकारणाऱ्या आजीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोलापूर येथील जोडभावी पेठच्या आदर्श सोसायटीतील आहे. नातवाला लवकर लग्न करण्याची इच्छा होती. आजी मात्र आलेली स्थळं नाकारत होती. आजी आपल्या लग्नात अडथळा आणत असल्याचं मानून मुलाने आजीची हत्या केली. या घटनेबद्दल ऐकून अनेकजणं हैराण झाले आहेत. या घटनेनंतर 25 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत आरोपीने आपला गुन्हादेखील कबुल केला आहे. आजीने लग्नाची अनेक स्थळं नाकारली म्हणून... मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथे राहणारी मृत महिला मलनबी हसन नदाफने आपला नातू सलीम नदाफला लग्नासाठी कर्नाटकातून घरी बोलावलं होतं. नदाफसाठी जी स्थळं आली होती, त्यातील काही मुली त्याला आवडल्या होत्या. मात्र आजी सर्व मुलींमध्ये काहीतरी अवगुण काढत होती. आणि स्थळ नाकारत होती. नदाफला वाटलं आजी आपलं लग्न होऊ देणार नाही. त्यामुळे रागाच्या भरात नदाफ सोमवारी आपल्या आजीजवळ गेला आणि तिच्यासोबत वाद घालू लागला. प्रकरण इतकं वाढलं की, त्याने आजीला काठीने मारहाण केली. आजीचा जीव जात नाही, तोपर्यंत तो आजीला मारत राहिला. 'तू माझं लग्न का होऊ देत नाहीस, मला कर्नाटकातून का बोलावले'...मारताना तो असंच म्हणत होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या