सब फिल्मी है! बहिणीचं अपहरण करुन ट्रेनने पळवून नेत होते गुंड; कारने 230 किमीपर्यंत केला पाठलाग

सब फिल्मी है! बहिणीचं अपहरण करुन ट्रेनने पळवून नेत होते गुंड; कारने 230 किमीपर्यंत केला पाठलाग

येथील एका तरुणाच्या मित्राने कारने तब्बल 230 किलोमीटरपर्यंत पाठलाग करीत मित्राच्या बहिणीचा जीव वाचवला.

  • Share this:

लखनऊ, 19 जून : असं म्हणतात खरे मित्र नेहमी मदत करण्यासाठी काहीना काही मार्ग शोधून काढतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बिसंडा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. येथील एका तरुणाच्या मित्राने कारने तब्बल 230 किलोमीटरपर्यंत पाठलाग करीत मित्राच्या बहिणीचा जीव वाचवला. ही घटना 10 जून रोजी घडली आहे. एका आरोपीला पकडण्यात आलं, मात्र कारवाई न करता सोडल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. हे प्रकरण सोशल मीडियावर आल्यानंतर पोलिसांचा खरा चेहरा समोर आला.

ही घटना बिसंडा भागातील एका गावातील आहे. या गावातील 17 वर्षीय तरुणीला फसवून तिचं अपहरण करण्यात आलं होतं. बांदा रेल्वे स्टेशनवरुन तुलसी एक्सप्रेस ट्रेनमध्ये तिला बसविण्यात आलं. यानंतर तरुणीला चार तरुणांच्या हवाली करण्यात आलं होतं. हे चौघेजणं तिला मुंबईला घेऊन जात होते. बहिण बेपत्ता झाल्याचं कळताच किरणने (नाव बदललं आहे) आपला मित्र मोहम्मद (नाव बदललं आहे) याला सर्व हकीकत सांगितली. किरणच्या बहिणीला वाचविण्यासाठी मोहम्मदने प्रयत्न सुरू केले. सर्वात आधी ते अतर्सा रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथे चौकशी केली, मात्र काहीच माहिती हाती लागली नाही. त्यानंतर रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज मागितले, मात्र त्याची परवानगी मिळाली नाही.

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मित्राने दिली माहिती

तपास करीत असताना तिसऱ्या एका मित्राने याबाबत माहिती दिली. तो तुलसी एक्सप्रेसवरुन मुंबई जाण्यासाठी बांदा रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. फोनवर बोलत असताना त्याने किरणच्या अपहरणाची माहिती दिली आणि तिचे फोटो व्हॉट्सअॅपवर मित्राला पाठवले. त्यानंतर किरण आणि मोहम्मददेखील बांदा स्टेशनवर पोहोचले. यावेळी मित्राच्या सांगण्यानुसार त्यांनी बहिणीचा शोध घेतला.

हे ही वाचा-VIDEO : 'होमगार्डसारखा राहा की...', पुण्यात आलिशान गाडीतील महिला पोलिसाची मुजोरी

ट्रेनचा पाठलाग करीत होते, झांसी येथे ट्रेन पकडली

सूचना मिळताच किरणने आपल्या दुसऱ्या बहिणीची कार मागितली आणि ट्रेनचा पाठलाग केला. मात्र महोबा स्टेशनवर पोहोचेपर्यंत ट्रेन निघून गेली होती. त्यानंतर मऊरानी स्टेशनवर पोहोचपर्यंत ट्रेन पुढे निघून गेली होती. शेवटी झांसी जीआरपीशी संपर्क करीत कोच नंबर आणि मुलीचा फोटो पाठवला. सूचना मिळताच अलर्ट झालेले झांसी जीआरपीनी ट्रेन थांबवली व कोचला घेराव घातला. कोचमध्ये तपास केल्यानंतर तरुणी सापडली. मात्र तिचं अपहरण करणारे पळून गेले होते.

Published by: Meenal Gangurde
First published: June 19, 2021, 11:40 PM IST

ताज्या बातम्या