मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलींनी आईची हत्या करुन तिच्याच साडीने घेतला गळफास; चार दिवस तिघींचे मृतदेह घरात पडून

मुलींनी आईची हत्या करुन तिच्याच साडीने घेतला गळफास; चार दिवस तिघींचे मृतदेह घरात पडून

आत्महत्या केलेली मोठी बहीण बीएससीनंतर बीटीसी करीत होती. तर लहान मुलगी बीए पास होती.

आत्महत्या केलेली मोठी बहीण बीएससीनंतर बीटीसी करीत होती. तर लहान मुलगी बीए पास होती.

आत्महत्या केलेली मोठी बहीण बीएससीनंतर बीटीसी करीत होती. तर लहान मुलगी बीए पास होती.

    फिरोजाबाद, 6 जून : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी अत्यंत भयावह कृत्य केलं आहे. या दोघींनी आईच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यानंतर आईच्या साडीने मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेवटी चार दिवसांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून तीनही मृतदेह बाहेर काढले. वडील व भावांपासून राहत होते वेगळे विमला देवा उर्फ विमलेश आपल्या दोन मुलींसह 24 वर्षीय ममता आणि 20 वर्षीय रेणू यांच्यासोबत एकाच घरात राहत होती. तिचा वती वेदराम रजावली पोलीस चौकीजवळ वेगळं राहत होता. तो मजुरी करतो. त्यांची तीनही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरातून कुजलेला वास येऊ लागल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हे ही वाचा-महाराष्ट्रातील 2 वर्षांचा चिमुरडा अंधश्रद्धेचा बळी; पोटावर गरम विळ्याचे चटके मृत अवस्थे आई व दोन मुली स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दार आतून बंद असल्याने त्यांनी दरवाजा तोडला. घरामधील दृश्य पाहून सर्वजण हैराण झाले. जमिनीवर महिलेचा मृतदेह होता तर दोन्ही मुली वर लटकत होत्या. मृतदेहांमधून दुर्गंधी येत होती. महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याचं दिसत होतं. मुलीचं झालं नव्हतं लग्न गावात राहणाऱ्या महिलेचा पूत्र शैतान सिंह याने सांगितलं की, त्याच्या बहिणींनी लग्न केलं नव्हतं. लग्नाबद्दल विचारलं तर त्या करिअरचं कारण सांगत होत्या. मोठी बहीण बीएससीनंतर बीटीसी करीत होती. तर लहान मुलगी बीए पास होती. बहिणी आणि आईंमध्ये वारंवार वाद होत होता. एसएससी अशोक कुमार यांनी घटनास्थळी जाऊन याची माहिती घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांचे मृतदेह तब्बल चार दिवसांपासून पडून असल्याचं दिसत आहे. त्यांच्या घरात फार कुणाचं येणं-जाणं नव्हतं. त्यामुळे चार दिवसांपर्यंत मृतदेह घरात असतानाही कोणाला याबाबत कळालं नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Murder, Suicide

    पुढील बातम्या