धक्कादायक: मुलीने पालकांकडेच मागितली 12 मिलियन डॉलरची खंडणी, प्रकरण वाचून बसेल धक्का!

धक्कादायक: मुलीने पालकांकडेच मागितली 12 मिलियन डॉलरची खंडणी, प्रकरण वाचून बसेल धक्का!

आई वडीलांप्रती असलेल्या रागातून हे मेल केल्याचे तिने सांगितले. पालक लहान बहीणीवरच जास्त प्रेम करतात असं तिला वाटत होतं.

  • Share this:

मुंबई 04 ऑगस्ट: आई वडिल आपल्याकडे लक्ष देत नाहीत असा समज झाल्याने एका मुलीने केला आपल्या पालकांना खंडणी मागीतली. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. आई वडील आपल्याकडे लक्ष देत नाही, तसेच छोट्या बहिणीवरच प्रेम करतात याचा राग मनांत धरुन अल्पवयीन मुलीने पालकांनाच धमक्यांचे मेल केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बोरीवली परिसरात रहाणारे एक चार्टर्ड अकाऊंटंट  एका नामांकीत बँकेत उच्चपदावर कार्यरत आहेत. यांच्या पत्नीच्या ईमेल अकाऊंटवर 16ते 19 जुलै दरम्यान सतत धमकीचे मेल येत होते. या कालावधीत chunhuayang399@gmail.com, congven58@gmail.com, pinching181@gmail.com या वेगवेगळया तीन ईमेल अकाऊंटवरुन मी चिनी आहे असे सांगुन प्रथम एक लाख रुपयांची व नंतर 12 मिलीयन डॉलरची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांच्या पत्नी व लहान मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी ईमेल्स मध्ये देण्यात आली होती.

ते बॅकेत महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याने  कामाच्या संबंधाने कोणीतरी पैशाची मागणी करुन धमकावत असल्याचे त्यांना वाटले. पण सतत ई मेल येत असल्याने  कुटुंबीयांची झोप उडाली होती. त्यानुसार मुंबई क्राईम ब्रांच मध्ये कलम 387 अन्वये गुन्ह्याची देखील नोंद करण्यात आली.

दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली अयोध्या, PHOTOS पाहून बसणार नाही विश्वास

पोलिसांनी तीनही ईमेल अकाऊंटबाबत बारकाईने तांत्रिक तपास सुरु केला. तपासा दरम्यान  ईमेल्स हे तक्रारदारांच्या नांवे असलेल्या मोबाईल वरुनच केले आल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर तक्रारारदारांना विश्वासात घेवून पोलिसांनी माहीती घेतली. तेव्हा त्यांना कळाले की  सध्या लॉकडाऊन असल्याने ते  वर्क फ्रॉम होम करीत आहेत, त्याकरीता लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करतात.

तसेच त्यांच्या पत्नीकडेही मोबाईल फोन आहे व त्यांच्या बारा वर्षीय मुलीस त्यांनी ऑनलाईन शिक्षणाकरीता मोबाईल फोन घेवून दिलेला आहे.  ज्या मोबाईलवरून हे धमकीचे ईमेल केले गेले तो फोन त्या मुलीचाच असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी पालकांच्या उपस्थितीत मुलीची चौकशी केली तेव्हा तिने हे ईमेल केल्याचं मान्य केलं.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा आज उच्चांक, तब्बल 12,323 जणांना मिळाला डिस्चार्ज

आई वडीलांप्रती असलेल्या रागातून हे मेल केल्याचे तिने सांगितले. आई वडील हे तिच्याकडे लक्ष न देता फक्त लहान बहीणीस लळा लावतात, प्रेम करतात त्यामुळे आपल्यावर आईवडील प्रेम करीत नाहीत, वारंवार रागावून बोलतात ही भावना मनात निर्माण झाल्याने तिझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आले होते. आई वडीलांप्रती असलेला रागाचा बदला घेण्यासाठी, पोलीसांनी आई वडीलांना अटक करुन त्रास द्यावा या हेतूने तिने हे ईमेल्स केल्याचे सांगितले.

मुलगी 12 वर्षांची अल्पवयीन आहे. त्यामुळे मुलगी आणि पालकांचं समुदेशन करत हा हे प्रकरण सोडविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मात्र घरात वापरतांना पालकांनी मुलांच्या भाव भावनांकडे लक्ष दिले पाहिजे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 4, 2020, 11:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading