मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तब्बल 10 वर्षे आईच्या मृतदेहासोबत एकाच छताखाली राहत होती मुलगी; कारण ऐकून परिसरात खळबळ

तब्बल 10 वर्षे आईच्या मृतदेहासोबत एकाच छताखाली राहत होती मुलगी; कारण ऐकून परिसरात खळबळ

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे

टोकियो, 30 जानेवारी : एक जपानी महिला तब्बल 10 वर्षे आपल्या आईच्या मृतदेहासोबत एकाच घरात राहत असल्याचे वृत्त समोर आले आहे. या महिलेने आपल्या आईचा मृतदेह तब्बल 10 वर्षांपर्यंत आपल्या अपार्टमेंटच्या फ्रीजरमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आईच्या मृत्यूची बातमी बाहेर गेली तर तिच्या हातून घरही निघून जाईल, या भीतीपोटी महिलेने तब्बल 10 वर्षे आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला. पोलिसांनी न्यूज एनन्सी एएफपीला सांगितलं की, या प्रकरणात 48 वर्षीय युमी योशिनो यांना टोकियोतून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात योशिनोने सांगितलं की, तिने दहा वर्षांपासून आईचा मृतदेह लपवून ठेवला होता. कारण महिलेला त्या घरातून बाहेर पडायचं नव्हतं. या घरात तिने आईसोबत बरेच आठवणीतील क्षण घालवले होते. त्यामुळे आईच्या आठवणी कायम राहाव्या म्हणून तिला त्याच घरात राहायचं होतं. क्योडो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या मृत्यूच्या वेळी त्यांचं वय 60 वर्षे होतं. नगर निगमच्या निवासी परिसरात त्यांना एका ठराविक पट्ट्याच घर घेण्यात आलं होतं.

हे ही वाचा-पत्नीसोबत झालं भांडण; बेडरुममध्ये गळफास घेऊन BARC वैज्ञानिकाची आत्महत्या

योशिनीने आपल्या आईच्या मृत्यूनंतर घरातील एका कोठडीमध्ये गुप्त फ्रीजचा शोध घेतला होता. आणि त्यामध्ये महिलेने आपल्या आईचा मृतदेह ठेवला होता. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या आईच्या मृत्यूचं कारण आणि वेळ नेमकं सांगू शकत नाही. रिपोर्टमध्ये दिेृलेल्या माहितीनुसार घराचं भाडं दिलं नसल्यामुळे योशिनीला जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत अपार्टमेटं रिकामी करण्याची जबरदस्ती केली होती.

First published:

Tags: Crime news