Home /News /crime /

आंतरजातीय विवाहानंतर पहिल्यांदा माहेरी आली मुलगी; बापाची गोळी घालून आत्महत्या

आंतरजातीय विवाहानंतर पहिल्यांदा माहेरी आली मुलगी; बापाची गोळी घालून आत्महत्या

या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे

    नवादा, 3 ऑक्टोबर : माजी सरपंचाच्या मुलीने दुसऱ्या समुदायातील मुलीसोबत प्रेमविवाह करुन त्याच गावात स्थायिक झाली होती. मात्र त्याचा परिणाम असा झाला की निराशेच्या भरात बापाने स्वत:चाच जीव घेतला. माजी सरपंचाने आत्महत्या केल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप पोलिसांनी याचा पुरावा मिळू शकलेला नाही. ही घटना नवादातील अमावा गावातील आहे. येथे माजी सरपंचाने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी जेव्हापर्यंत याबाबत माहिती कळवली, तोपर्यंत गावकरी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या मृतदेहवार अंत्यसंस्कार केले होते. या घटनेनंतर गावात पोहोचलेल्या एसआय चौधरी यांनी गावकऱ्यांना याबाबत विचारलं तर कोणीत त्याची माहिती दिली नाही. एसआयचं म्हणणं आहे की, कोणीच या घटनेविषयी काहीही सांगण्यास तयार नाहीत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी सरपंच यांच्या मुलीने गेल्या वर्षी दुसऱ्या समुदायातील मुलाशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघं कलकत्त्याला राहत होते. हे ही वाचा-एक -दोन नाहीत महाराष्ट्रात घडले 47 'हाथरस'; राज्यातील धक्कादायक आकडेवारी समोर मात्र काही दिवसांपूर्वी हे दोघे मुलीच्या माहेरच्या गावात येऊन राहत होते. मात्र यानंतर मुलीच्या वडिलांना ही बाब आवडली नाही. ते निराश झाले. त्यानंतर त्यांनी स्वत: गोळी मारून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विषेश म्हणजे गावकरी व कुटुंबीयांकडून पोलिसांना योग्य ती माहिती सांगितली नसल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या आंतरजातीय विवाहाला वडिलांचा विरोध होता. त्यात ते दोघे गावात येऊन राहत असल्याचे त्यांना सहन झाले नाही. व त्यातून त्यांनी गोळी घालून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sucide

    पुढील बातम्या