डोंबिवली हादरलं, 9 वर्षांची मुलगी दारात खेळत होती आणि बापानेच....

डोंबिवली हादरलं, 9 वर्षांची मुलगी दारात खेळत होती आणि बापानेच....

डोंबिवलीमध्ये मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 02 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

आपल्या 9 वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका 32 वर्षीय व्यक्तीस रामनगर पोलिसांनी अटक केली असून पोक्सा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वेतील शेलारनाका येथे पीडित मुलगी तिच्या आजीकडे राहात आहे. मुलीच्या आईला टिबीचा आजार असल्याने ती आजीकडे राहण्यास आली होती. गुरुवारी दुपारी मुलगी खेळण्यासाठी आपल्या घरी गेली होती. त्यावेळी वडील झोपलेले होते.

झोपेतून जागे झाल्यानंतर वडिलांनी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने वडिलांच्या ताब्यातून आपली सुटका करत आजीचे घर गाठले. त्यानंतर आईला तिने घडलेला प्रसंग सांगितला.

'आमचे ब्लाउज ओढले, खासदारांना खाली पाडले', उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप

आपल्या लेकीसोबत बापाने असे कृत्य केल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पीडितेच्या आईने रामनगर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी 32 वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली.

महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलिसाला अटक

दरम्यान, नागपूरमध्ये घटस्फोटीत महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. विक्रमसिंग बनाफर आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.  पीडित महिला अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदामनगरात राहते. 14 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला एक मुलगी आहे. घरगुती कारणावरून पती पत्नीत वाद झाल्यानंतर पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला.

हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार, संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

आरोपी पोलिसांसोबत सहा वर्षांपूर्वी तिची ओळख झाली. बेसा बेलतरोडीतील एका मित्राकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे आले असताना त्यांनी येथे मुक्काम केला. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला गुंगीचा पदार्थ दिला आणि तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले.

मोबाईलमध्ये त्याने या संबंधाची अश्लील क्लिप बनविली. ती क्लिप दाखवून तो तिला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. तब्बल सहा वर्षांपासून तो त्या महिलेला ब्लॅकमेल करत होता, शेवटी पीडित महिलेनं मैत्रिणीचा आधार घेऊन पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: October 2, 2020, 2:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या