मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी
मुंबई, 14 ऑक्टोबर : 'आपल्या वडिलांचा समाजातील लोकांनी करणी केल्याने मृत्यू झाला आहे', असा समज करून दोन भावानी समाजातील चार जणांच्या हत्येचा कट रचला होता. यातून एका वृद्धाची हत्या देखील झाली. मात्र, तीन जणांची हत्या करण्याआधीच मुलुंड पोलिसांनी त्या दोन भावांसह चार हत्येची सुपारी घेणाऱ्यांना असे एकूण सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी मारुती लक्ष्मण गवळी या 70 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येत मुलुंड पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नव्हता. मात्र, मारुती हे जोगवा मागत असत त्यामुळे या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास केला.
RTPCR किटवरून मंत्र्यांमध्येच विसंवाद, देशमुखांनी फेटाळलं टोपेंचं मत
या वेळी त्यांच्या समाजातील काही लोकांनी पोलिसांना यात अंधश्रद्धेतून हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला. मागील महिन्यात कन्हैय्या मोरे या तरुणाच्या ओळखीतील व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता आणि त्याच्या मुलांना समाजातील काही लोकांनी करणी केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय होता.
या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जे चार लोक समाजातील आले होते. त्यांचे हे काम असावे म्हणून त्यांची हत्या करण्याचे आरोपी दीपक मोरे आणि कन्हैय्या मोरे या दोन भावांनी ठरवले होते. यासाठी दीपक मोरे आणि कन्हैया मोरे या दोघांनी मोहम्मद आसिफ नासिर शेख, मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी, मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान आणि शहानवाज ऊर्फ सोनू अख्तर शेख यांना 70 हजार रुपयांची सुपारी दिली होती.
हार्दिक पांड्याकडे आहे 53 हिरे असलेले घड्याळ! किंमत वाचून तुमचे डोळे फिरतील
2 ऑक्टोंबरला या टोळीने या चार व्यक्तींपैकी मारुती गवळी यांची हत्या केली. तर यातील दुसरा इसम गावाला गेल्याने त्याचा हत्येचा प्लॅन आणि इतर आणखी दोघांचा प्लॅन ही आखत होते. मात्र, मुलुंड पोलिसांनी वेळेतच या सर्व हत्येचा छडा लावल्याने आणखी तीन हत्या रोखल्या गेल्या. मात्र, अजून ही 21 व्या शतकात अंधश्रद्धेपोटी हत्या होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.