गोरखपूर, 21 जानेवारी : गोरखपूरमध्ये (Gorakhpur) शुक्रवारी दिवाणी न्यायालयाच्या गेटवर (Civil Court) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका आरोपीची (Rape Accused) बापानं गोळी घालून हत्या (Murder) केली. या घटनेनंतर गोंधळ उडाला. (The father ended the rapist in front of the court gates)
गोळी लागून ज्याचा मृत्यू झाला त्याचं नाव दिलशाद हुसैन (Dilshad Hussain) असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीला ज्याने गोळी घातली ते पीडित मुलीचे वडील असल्याचं समोर आले आहे. दिलशाद याला जामीन मिळाला होता आणि हजेरीसाठी तो कोर्टात आला होता. त्यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्यावर गोळी घालून हत्या केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.
ही घटना कोर्टाच्या गेटवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिलशाद हुसैन कोर्टात एका वकिलाला भेटण्यासाठी आला होता. यादरम्यान कोर्टाच्या मुख्य गेटवर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. असा आरोप करण्यात येत आहे की, त्यावेळी काही पोलीस कर्मचारी तेथे उभे होते. मात्र गोळीच्या आवाजाने ते पळून गेले. या हत्येच्या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा-भयंकर! संशयाने केला घात; महिलेनं पतीचं छाटलं मुंडकं, शीर घेऊन पोलिसांत झाली दाखलजामिनावर बाहेर होता आरोपी
30 वर्षीय दिलशाद हुसैन अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात जामीन मिळाला होता. या केसमध्ये त्याची पहिली तारीख होती. दिलशाद हुसैन याने दुपारी आपल्या वकिलाला फोन केला. कोविड प्रोटोकॉल असल्यामुळे वकील बाहेर येऊन त्याला भेटणार होता. यादरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी त्यांना पाहताच गोळी चालवली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे गदारोळ उठला. दिलशाद हुसैन बिहारचा राहणारा होता. पोलिसांनी या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.