पंजाब, 17 जून : मुक्तसरजवळील गावात तब्बल 3 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या तरुणीचा सासरीच मृत्यू झाला आहे. याघटनेनंतर तरुणीच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप लावला आहे. दरम्यान तरीही तरुणीच्या सासरच्या मंडळींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर दुसरीकडे तरुणीचा पोस्टमार्टम करण्यातही दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त आई-वडिलांनी आंदोलन पुकारलं आहे.
लग्नाच्या 15 दिवसांपासून सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी दिला त्रास
यावेळी घटनास्थळी मृत गगनदीप कौर हिचे नातेवाईक परमजीत सिंग यांनी सांगितलं की, गगनदीप कौर हिचं लग्न तीन महिन्यांपूर्वी गुरप्रीत सिंग या तरुणाशी लावून दिलं होतं. लग्नाच्या वेळी परिस्थितीनुसार त्यांना हुंडाही देण्यात आला होता. लग्नाच्या 10 ते 15 दिवसांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र त्यानंतर सासरची मंडळी हुंड्यासाठी मुलीला त्रास देऊ लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला मारहाण केली व माहेरी सोडून गेले. त्यानंतर पंचायतीत हे प्रकरण गेलं आणि सर्व भांडण सोडवून मुलगी सासरी गेली. मात्र त्यानंतर पुढील 10 दिवसात सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा मारहाण करुन माहेरी सोडलं. पंजाब केसरीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा-2000 KM मर्डर मिस्ट्री; नाशिकमध्ये प्लान, कलकत्त्यात हत्या, झारखंडमध्ये फेकलं शवतिचा हा मेसेज होतोय व्हायरल
गेल्या 20 दिवसांपासून ती माहेरीच राहत होती. 2 दिवसांपूर्वी मुलाची आई, नवरा आणि नणंद गावात आले व मुलीला घेऊन गेले. त्याच दिवशी मुलीच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मुलीचा एक ऑडिओ मेसेज आला होता, ज्यात तिने सांगितलं होतं की, सासरच्या मंडळींनी तिला सल्फास नावाची गोळी दिली आहे. यानंतर मुलीच्या पतीचा फोन आला की, मुलीने सल्फास खाल्ली आहे. हे ऐकताच मुलीच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. जेव्हा मुलीचे नातेवाईक तेथे पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह रुग्णवाहिकेत पडला होता आणि तिच्याजवळ कोणीच नव्हतं. मुलींवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तिच्या आई-वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.