तंत्रविद्येपायी आईनेच मोठ्या मुलाचा घेतला जीव; तूप-मसाले टाकून जाळलं, हाडांची मोळी करून...

तंत्रविद्येपायी आईनेच मोठ्या मुलाचा घेतला जीव; तूप-मसाले टाकून जाळलं, हाडांची मोळी करून...

घटनास्थळावरुन अनेक धक्कादायक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

  • Share this:

कलकत्ता, 12 डिसेंबर : पश्चिम बंगालची राजधानी कलकत्यात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने 25 वर्षांच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. (mother killed his son) त्याचा मृतदेह तूप, कपूर आणि मसाल्यांसह जाळून टाकण्यात आलं. यानंतर हाडे छतावर फेकून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तंत्र-विद्येतून ही अत्यंत भयंकर घटना घडल्याची शक्यता आहे. अद्याप पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचं नाव गीता माहेनसरिया आहे. पतीसोबत वाद असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दोघे वेगळे राहत आहेत. त्यातच गेल्या अनेक दिवसात मोठा मुलगा अर्जुन (25) याचा संपर्क न झाल्याने त्याचे वडील अनिल यांनी बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट दाखल केला होता.

बिधाननगर पूर्वकडील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एजे ब्लॉक येथील दोन मजली घरात एका पुरुषाच्या अर्धवट जळालेल्या हाडाचे अवशेष सापडले. याबाबत माहिती समोर आल्यानंतर या घरात राहणारी मृत मुलाची आई आरोपी गीता आणि छोटा मुलगा विदूर (22) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरुन अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. यामध्ये रक्ताने माखलेला दगड, जळालेले मास्क आदी गोष्टी सापडल्या आहे. मृतदेह जाळल्यानंतर शिल्लक राहिलेली हाडं टॉवेलमध्ये लपटण्यात आले होते व छतावर ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी याबाबत आरोपी गीता हिची चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की, जळताना येणार वास कमी करण्यासाठी कपूर, तूप आणि मसाल्यांचा वापर करण्यात आला होता. हत्या, षड्यंत्र, गुन्हेगारी कृत्य अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपींचे मानसिक स्वास्थ तपासण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी हाडांचे सँम्पल डीएनए टेस्टसाठी पाठविले आहे.

मृत मुलाचे वडील अनिल यांनी सांगितलं की, माझा मुलगा अर्जुन याला ह्रदय व मेंदूसंदर्भातील त्रास होता. घरात कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती. मोठं घऱ, दोन कार आणि दागिने अशी संपत्ती आहे. माझा लहान मुलगा उटीमध्ये शिकत होता. मुलीचेही चांगलं शिक्षण सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 12, 2020, 2:50 PM IST
Tags: Murder

ताज्या बातम्या