मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

घृणास्पद प्रकार; बाल लैंगिक शोषण प्रकरणात बडतर्फ BJP नेत्याच्या लॅपटॉपमधील VIDEO पाहून पोलीस हादरले

घृणास्पद प्रकार; बाल लैंगिक शोषण प्रकरणात बडतर्फ BJP नेत्याच्या लॅपटॉपमधील VIDEO पाहून पोलीस हादरले

नेत्याच्या चौकशीदरम्यान समोर आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले...पक्षाने नेत्यावर कारवाई करीत त्याला बडतर्फ केलं आहे

नेत्याच्या चौकशीदरम्यान समोर आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले...पक्षाने नेत्यावर कारवाई करीत त्याला बडतर्फ केलं आहे

नेत्याच्या चौकशीदरम्यान समोर आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले...पक्षाने नेत्यावर कारवाई करीत त्याला बडतर्फ केलं आहे

  • Published by:  Meenal Gangurde
जालौन, 14 जानेवारी : गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणातील काळी बाजू समोर येत आहे. देश चालविणाऱ्या नेत्यांबाबत अशा बातम्या पाहून नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील उदाहरण ताजं असताना उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात बाल लैंगिक शोषण प्रकरणात बडतर्फ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून लॅपटॉप, डीव्हीडी आणि हार्ड डिस्कमधून धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. (BJP leaders pornographic video in child sexual abuse case came to the fore ) पोलिसांना हा सर्व प्रकार पाहून धक्काच बसला. ते याप्रकरणात पुढील तपास करीत आहेत. कोंच पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितलं की, कोंच भागातील भगत सिंह नगरमधून  रामबिहारी राठोड (65) यांना बाल लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या घरातून लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमध्ये 15 ते 20 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी लहान मुलांसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करीत असल्याचे दिसत आहे. त्यांनी सांगितलं की, पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. एसएचओ यांनी सांगितलं की, राठोड सुरुवातील पैशांचं आमिष दाखवून लहान लहान मुलांना आपल्या जाळ्यात खेचत असतं आणि त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल करीत होते. तो लहान लहान मुलांना धमकी देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. राठोड याला बुधवारी तुरुंगात पाठविण्यात आलं असून पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. हे ही वाचा-धनंजय मुंडे प्रकरणी भाजप नेत्याचा नवा ट्विस्ट: 'ती मलाही ब्लॅकमेल करत होती' एका प्रश्नाचं उत्तर देताना खान यांनी सांगितलं की, बाल लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणात बांदाच्या तुरुंगात बंद असलेले पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्या प्रकरणाशी जोडणं सध्या तरी घाई ठरेल. मात्र या मुद्द्यावरुन सध्या तपास सुरू आहे. भाजपमधील जालौन जिल्हाध्यक्ष रामेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं की, रामबिहारी राठोड कोंच भागातील भाजप नगराचे उपाध्यक्ष होते. (BJP leaders pornographic video in child sexual abuse case came to the fore) मात्र बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांना पद आणि पार्टीच्या प्राथमिक सदस्यतेतून बरखास्त करण्यात आलं आहे.
First published:

Tags: BJP, Crime news

पुढील बातम्या