Home /News /crime /

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होतं घृणास्पद कृत्य; छापेमारीचा Live Video आला समोर

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होतं घृणास्पद कृत्य; छापेमारीचा Live Video आला समोर

स्पा सेंटरच्या नावावर सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींबाबत मिळालेल्या सूचनेनंतर पोलिसांनी छापेमारी केली आणि स्पा सेंटरमधून 5 महिलांसह 8 जणांना अटक केली आहे.

    फतेहाबाद, 14 मे : स्पा सेंटरच्या नावावर सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींबाबत मिळालेल्या सूचनेनंतर पोलिसांनी छापेमारी केली आणि स्पा सेंटरमधून 5 महिलांसह 8 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, 5 महिलांमध्ये स्पा सेंटरच्या संचालिकेचाही समावेश आहे. ही घटना फतेहाबादमधील हुड्डा सेक्टर 3 येथील आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती. पोलिसांनी सांगितलं की, लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद आहे, मात्र असं असतानाही हुड्डा सेक्टर 3 मध्ये स्पा सेंटर आणि अवैध स्वरुपात चालवलं जात आहे. सूचना देणाऱ्यांनी सांगितलं होतं की, या स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि शहरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि महिला ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत स्पा सेंटरवर छापेमारी केली. हा स्पा सेंटर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आला होता. पोलिसांनी जेव्हा छापेमारी केली तेव्हा स्पा सेंटरचं शटर बंद होतं. मात्र आत लोक उपस्थित होते. पोलिसांनी बराच काळ प्रयत्न करून स्पा सेंटर उघडलं आणि आत गेले. त्यांनी स्पा सेंटरच्या आत जाऊन कारवाई केली. हे ही वाचा- तुरुंगात गँगवॉर, मुख्तार अन्सारींच्या निकटवर्तीयांसह दोन गुंडांची हत्या काही वेळानंतर डीएसपी दलजीत सिंह घटनास्थळी पोहोतले आणि स्पा सेंटरमध्ये 5 महिला, ज्यात एक स्पा सेंटरची संचालिकादेखील आहे. त्यासोबत 8 लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला आहे. मात्र डीएसपींनी सांगितलं की, त्यांनी या स्पा सेंटरमधून 5 महिला आणि 3 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Crime news, Live video

    पुढील बातम्या