मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

राम राम म्हणत रंगमंचावरच कलाकाराचा मृत्यू; रामलीलेदरम्यान 'दशरथा'ने सोडला जीव

राम राम म्हणत रंगमंचावरच कलाकाराचा मृत्यू; रामलीलेदरम्यान 'दशरथा'ने सोडला जीव

रंगमंचावर रामलीलेचा प्रयोग सुरू होता. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात जाण्यासाठी निघाले होते. दशरथाला रंगमाचंवर कोसळलेलं पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवत होते.

  • Published by:  Meenal Gangurde

उत्तर प्रदेश, 16 ऑक्टोबर : बिजनोरमध्ये (Uttar Pradesh News) रामलीलादरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. तो दशरथची भूमिका निभावत होता. डायलॉग म्हणत असतानाच कलाकार रंगमंचावर कोसळला. रामलीला पाहणाऱ्या प्रेक्षकांना वाटलं की, तो अभिनय करीत आहे. ते हे सर्व पाहून ताळ्या वाजवू लागले. जेव्हा त्यांना कळालं की, कलाकाराचा मृत्यू झाला आहे सर्वांना मोठा धक्का बसला.

हे प्रकरण हसनपूर गावातील आहे. येथे सप्तमी ते दसऱ्यापर्यंत रामलीलाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये माजी प्रधान राजेंद्र सिंह राजा दशरथ याची भूमिका निभावत होते. वडिलांच्या आज्ञेनंतर जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात जात होते. दशरथाची भूमिका निभावणारे राजेंद्र यांनी महामंत्री सुमंतला पाठवलं आणि त्यांना जंगल दाखवून परत घेऊन या असं सांगितलं. (The death of the actor on the stage saying Ram Ram During Ramlila Dasharatha actor death)

सर्वांना वाटलं अभिनय सुरू आहे..

सुमंतला रामाशिवाय येताना पाहून राजा दशरथ भावुक झाले. भगवान श्रीरामाच्या वियोगात ते राम राम ओरडू लागले. दोन वेळा राम म्हटल्यानंतर दशरथ झालेले राजेंद्र सिंह अचानक रंगमंचावर कोसळले. सर्वांना वाटलं ते अभिनय करीत आहेत आणि त्यांनी रंगमंचावर जीव सोडला.

हे ही वाचा-चालत्या कारचं स्टेअरिंग लॉक झाल्याने मोठा अपघात, महिला डॉक्टरचा जागीच

रामलीला केली स्थगित..

पडदा पडल्यानंतर सोबतच्या कलाकारांनी राजेंद्र सिंग याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत कळताच रामलीला रोखण्यात आली. सांगितलं जात आहे की, हृदयाचे ठोके थांबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अनेक वर्षांपासून करीत होते अभिनय

रामलीला समितीशी संबंधित गजराज सिंहने सांगितलं की, राजेंद्र सिंह अनेक वर्षांपासून रामलीलाची भूमिका निभावत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, दोन मुली आहेत. BSF मध्ये तैनात छोटा मुलगा घरी पोहोचल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.

First published:

Tags: Death, Ram, Uttar pradesh