चिपळूण, 02 डिसेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील असुर्डे येथील निर्मळवाडी धरणात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाऊ, बहीण आणि आईचा मृतदेह धरणाच्या पात्रात आढळून आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावातल्या धरणात आज सकाळी 3 जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिघेही एकाच कुटुंबातील असून यात आई, मुलगी आणि एका मुलाचा समावेश आहे. मयुरी बाबाराम चोगले, हर्ष बाबाराम चोगले आणि शारदा बाबाराम चोगले अशी तिघांची नावे आहेत.
पंकजा मुंडे यांची कोविड चाचणी निगेटिव्ह, सर्वांचे मानले आभार
हे तिघेही गुरुवारी लाकडं आणण्यासाठी जंगलात गेले होते आणि तेव्हापासूनच बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. तिघेही एकाच वेळी मृत झाल्यामुळे त्यांच्या मृत्यचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
मात्र, त्यांच्या मृत्यबाबत परिसरात अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तिघांचाही एकापाठोपाठ बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मधमाशांचा विमानावर हल्ला, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
तिघांचे ही मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर तपास करण्यासाठी सावर्डे पोलीस असुर्डे येथील दाखल झाले असून तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे. घटनेचा पंचनामा केल्यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.