रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, संगमनेरमध्ये खळबळ

रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, संगमनेरमध्ये खळबळ

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

  • Share this:

संगमनेर, 27 जानेवारी : अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील संगमनेर (sangmner) तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

नाशिक-पुणे महामार्गालगत आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी 45 ते 50 वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

आणखी एक पुतण्या काकांविरोधात मैदानात, धवलसिंह मोहिते धरणार काँग्रेसचा 'हात'

सदर मृतदेह हा अज्ञात व्यक्तीचा असून त्याच्या अंगात निळसर राखाडी रंगाची फूल पॅन्ट, शर्ट फिक्कट गुलाबी, प्लास्टिक काळी चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या डोक्याला व छातीला मार असून प्राथमिक अंदाजानुसार खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनमाडमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी दोन मंदिरात फोडल्या दानपेट्या,LIVE VIDEO

मृत व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची च्रक फिरवत  दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.

Published by: sachin Salve
First published: January 27, 2021, 12:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या