Home /News /crime /

घराजवळच्या नाल्याशेजारी पोत्यात आढळला तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

घराजवळच्या नाल्याशेजारी पोत्यात आढळला तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

जगदीशचा मृतदेह त्याच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर नाल्याच्या कडेला सापडला.

    नरेंद्र मते/ वर्धा, 4 फेब्रुवारी : शहराला लागूनच असलेल्या नवीन (आष्टी) येथे राहत असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या घरापासून शंभर फुट अंतरावर नाल्याच्या कडेला पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आल्याचं वृत्त समोर आलं आहे. आज ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीसह एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. जगदीश भानुदास देशमुख (वर्ष 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोत्यात बांधून त्यांच्या घराच्या शंभर फुट अंतरावर नाल्याच्या कडेला आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रथमदर्शनी घातपात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांनी जगदीश यांच्या घराची पाहणी केली. त्यामधील लाकडी पाट्या, राफ्टर आढळले. पोलिसांनी जगदीशच्या पत्नीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेत चौकशी केली असता पत्नीने एकाच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले. मृतक जगदीश भानुदास देशमुख हा घर बांधकाम करण्याचे काम करायचा. जगदीश, त्याची आई, पत्नी व मुले असे एकत्र राहायचे. घटनेच्या दिवशी जगदीश यांची आई गावात नव्हती. रात्रीच्या सुमारास जगदीशची पत्नी आणि शुभम भीमराव जाधव (वय 22) या दोघांनी संगनमताने जगदीशला लाकडी दांड्याने ठार केले. जगदीशचा मृतदेह त्याच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर नाल्याच्या कडेला फेकून दिला. सकाळच्या सुमारास परिसरातील लोकांनी पोत्यात काय आहे, याबद्दल चर्चा सुरू होती. पोत्यात मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. हा मृतदेह जगदीश भानुदास देशमुख याचा असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी जगदीशच्या पत्नीसह शुभम भीमराव जाधव रा. आष्टी या दोघांवर गुन्हा दाखल करत अटक केली. पुढील तपास सुरू आहे. हे ही वाचा-कोरोना उपचारानंतर ढकललं Sex रॅकेटच्या जाळ्यात, 13 वर्षीय मुलीवर 6 महिने Rape अनैतिक संबंधातून हत्येचा संशय? जगदीशची पत्नी, शुभमने अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. 3 फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते चार वाजताच्यादरम्यान जगदीश घरी झोपला होता. कट रचून त्याची हत्या करण्यात आली. पुरावा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह घराबाहेर फेकण्यात आल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेगावकर, देवानंद केकन यांनी भेट दिली. ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक देरकर, पोलिस स्टेशनचे पथक गुन्ह्याचा तपास करीत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट, श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने तपासणी केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Wardha news

    पुढील बातम्या