मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मदरशाच्या क्लासरुममध्ये मुलीवर बलात्कार? मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ

मदरशाच्या क्लासरुममध्ये मुलीवर बलात्कार? मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ

मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
बिहार, 31 ऑक्टोबर : बिहारमधील (Bihar News) बेतियामधून एक अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे शनिवारी सायंकाळी उशिरा एका बेपत्ता मुलीचा मृतदेह (Dead Body) मदरशामधून सापडला आहे. मुलीसोबत दृष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम चंपारणमधील नरकटियागंजमध्ये त्यावेळी लोकांना धक्काच बसला. जेव्हा शिकारपूर पोलीस ठाणे हद्दीत घोबहा इस्लामिया मदरसामध्ये 15 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. सांगितलं जात आहे की, मुलगी सांयाकाळपासून घरातून बेपत्ता होती. तिचा शोध घेतला जात होता. (The dead body of a girl was found in a madrassa class room) तपासादरम्यान मुलीचा मृतदेह मदरसा इस्लामिया घोबहा टोलाच्या क्लास रुममध्ये सापडला. मुलीवर बलात्कार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि चुकीचं काम केल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हे ही वाचा-Love Marriage केलं म्हणून मुलीचं शुद्धीकरण; अर्धनग्न अवस्थेत नर्मदेवर नेलं आणि.. मदरशामधून मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोतल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीची ओळख पटवली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. नरकटियागंज डीएसपी कुंदन कुमार, शिकारपूर पोलीस ठाणे अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Dead body

पुढील बातम्या