नांदेड, 27 मे : महसूल विभागाकडून यापूर्वी देखील अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. पण रेती माफिया मात्र पुन्हा काही दिवसांनी रेती उपसा करताना दिसतात. नांदेड शहरालगत असे अनेक घाट सुरू असल्यानांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध रेती उपसा सुरू आहे. विशेष करून गोदावरी नदीकाठी वसलेल्या गावात तर मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना मिळाली होती. त्यावरून जिल्हाधिकारी स्वत: अवैध रेती घाटांवर पोहचले.
रेती माफियांना कारवाईची माहिती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मोटरसायकलीवरून घाटावर पोहोचले. या कारवाईबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयता ठेवली होती. सोबतच्या सहकारी अधिकाऱ्यांना देखील कारवाई बद्दल माहिती देण्यात आली नव्हती. मार्कंड आणि गंगाबेट या दोन ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी धाड टाकली. या कारवाईत दोन जेसीबी, एक बोट, अठरा रोप वे मशीन, सात हायवा गाड्या आणि जवळपास दीड हजार ब्रास रेती जप्त करण्यात आली.
हे ही वाचा-हैराण करणारा प्रकार; आईचा रिपोर्ट निगेटिव्ह, मात्र जन्मजात मुलीचा पॉझिटिव्ह
रेती माफीया मात्र फरार झाले. नांदेडमध्ये अशाच पध्दतीने मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरू आहे. काही माफियांना राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कारवाई होत नाही. रेती चोरी रोखण्याची जबाबदारी मुख्यतः पोलिसांची आहे. पण पोलिसांकडून कधीच अशी कारवाई होत नसल्याचं सांगितलं जात आहे. सर्रासपणे रेती चोरी केली जात असल्याने महसूल देखील बुडतो. नांदेडमध्ये यावर्षी फक्त चार रेती घाटांचे लिलाव झाले. तीन ते चार वेळा रेती घाटांचे लिलाव ठेवण्यात आले. पण त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. अवैधरित्या रेती चोरी करण्यात अडथडा येत नसल्याने पुन्हा महसूल भरून वाळू घाट घेण्यात रेती माफियांना रस नसल्याचे दिसते. रेती चोरी रोखण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने अनेक कठोर नियम केले. पण तरीही रेती चोरी थांबत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nanded