भिवंडी, 07 डिसेंबर : महिला अन्याय अत्याचाराच्या व घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत असतांनाच मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीकडून मुलीच्या संगोपनासाठी 30 हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. खळबळजनक बाब सदर रक्कम पत्नी देऊ न शकल्याने पतीने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलशाद गामा मोमीन, असं गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तर दीर सोनू आणि नौशाद (रा . शांतीनगर, भिवंडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. पीडितेचं काही वर्षांपूर्वीच आरोपी दिलशान याच्याशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यांनतर मार्च महिन्यात पीडित पत्नीला मुलगी झाली होती. त्यामुळे आरोपी पती याने 20 मार्च ते 18 मे 2020 या दोन महिन्यांच्या काळात पत्नीला मुलगी झाली म्हणून मुलीच्या संगोपनासाठी 30 हजार रुपये मागणीचा तगादा लावला होता. मात्र, माहेरची आर्थिक परिस्थिती नसल्याने 30 हजार रुपये देण्यास पीडित पत्नी असमर्थ ठरली होती. त्यामुळे पतीसह दोन दिरांनी आपसात संगनमत करून पीडित पत्नीचा छळ सुरू केला होता.
...ही तर देशी इस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ, सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
एकीकडे समाजातील आजही काही कुटुंबात वंशाला दिवा म्हणून मुलगाच झाला पाहिजे, अशी मानसिकता असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. तर दुसरीकडे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ ' हा केंद्र सरकारने नारा देत, यासाठी समाजात विविध कार्यक्रमाअंर्तगत जनजागृती राबवित आहे. मात्र, आजही समाजातील काही लालची आणि निर्दयी कुटुंब मुलाच्या हवशापोटी मुलीचा छळ करून तिला जन्म देणाऱ्या मातेचाही मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
WhatsApp वर Delete केलेला मेसेजही वाचता येणार; ही आहे ट्रिक
अखेर या छळाला कंटाळून विवाहितेने पतीसह दिरांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.