मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पैसे कमी केले नाही म्हणून ग्राहकाने दुकानादाराच्या कानाचा पाडला तुकडा; भर बाजारात घडला हा प्रकार

पैसे कमी केले नाही म्हणून ग्राहकाने दुकानादाराच्या कानाचा पाडला तुकडा; भर बाजारात घडला हा प्रकार

दाताना कानाचा तुकडा पाडल्यानंतरही ग्राहक थांबला नाही, तर त्याने भयावह कृत्य केलं.

दाताना कानाचा तुकडा पाडल्यानंतरही ग्राहक थांबला नाही, तर त्याने भयावह कृत्य केलं.

दाताना कानाचा तुकडा पाडल्यानंतरही ग्राहक थांबला नाही, तर त्याने भयावह कृत्य केलं.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 20 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बलिया जिल्ह्यातून असं वृत्त समोर आलं आहे, जे वाचून कदाचित तुम्हीही हैराण (Shocking News) व्हाल. ग्राहक आणि दुकानदाराचं नातं हे विचित्र असतं. एकतर ग्राहकाला स्वस्तात वस्तू हवी असते तर दुसरीकडे दुकानदाराला आपल्या नफ्यात वाढ हवी असते. अनेकदा या दोघांमध्ये छोटा फार वादही होते. मात्र उत्तर प्रदेशात या वादातून एका ग्राहकाने (customer) दुकानदाराचा काम कापल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना रसडा पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक बाजारातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरानी कोट मोहल्ल्यातील निवासी मोहम्मद आरिफ (25) मुंसफी नाक्याजवळील फुटपाथवर रेडिमेड कपडे विकतो. रविवारी त्यांच्या दुकानावर गाजीपुर जिल्ह्यातील निवासी मनोज कुमार गोंड पोहोचले आणि कपड्यांचा भाव करू लागले. यानंतर काही गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की मारहाणही झाली. रागाच्या भरात ग्राहक मनोजने दुकानदारावर हल्ला केला. यात त्याने दुकानदाराचा डाव्या कानाचा दाताने तुकडा पाडला. इतकच नाही, कापलेला कान दुकानाच्या मागच्या बाजूला फेकून दिला. कापलेला कान मिळू नये हा त्याचा डाव होता.

हे ही वाचा-12 वर्षांनी लहान तरुणावर महिलेचं जडलं प्रेम; अडसर ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा

दुसरीकडे दुकानदार आरिफ रक्ताच्या थारोळ्यात पाहून आजूबाजूचे लोक तातडीने तेथे आले व त्यांनी आरिफला रुग्णालयात हलवलं. रुग्णांची गंभीर अवस्था पाहून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. या घटनेबाबत माहिती मिळताच, पोलीसही तेथे पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना आरिफचा तुटलेला कान दुकानाच्या मागे सापडला. जखमी दुकानदार आरिफचे मोठे भाऊ आफताब आलम यांनी हल्लेखोर मनोज विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही आरोपीला अटक केली आहे.

First published:

Tags: Shocking news, Uttar pradesh