मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अंगावर डिझेल ओतून दाम्पत्याने घेतले पेटवून, चिपळूणमध्ये खळबळ

अंगावर डिझेल ओतून दाम्पत्याने घेतले पेटवून, चिपळूणमध्ये खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ठाकरे दाम्पत्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

रत्नागिरी, 31 जानेवारी : रत्नागिरीb (ratnagiri) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आला आहे, चिपळूण ( Chiplun) तालुक्यात एका दाम्पत्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूणमधील सावर्डे गावात ही घटना घडली आहे. अरूण सुभाष ठाकरे (वय 35) आणि शीतल अरुण ठाकरे (वय 31, दोन्ही रा. भुवडवाडी, सावर्डे ता. चिपळूण) अशी जखमींची नाव आहे. आज संध्याकाळी ठाकरे दाम्पत्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. यात दोघेही गंभीर भाजले आहे. जखमी अवस्थेत दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

('राज्यपाल मनमानी कारभार करतात', सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेची केंद्राकडे तक्रार)

ठाकरे दाम्पत्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

पेटलेल्या तरुणीने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

दरम्यान, अहमदनगरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेनं स्वत: ला पेटवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमधील तारकपूरमध्ये घडली आहे.  पूजा मनोहर चुघ (वय 33)  असं या तरुणीचे नाव आहे.

पूजाने आज दुपारी स्वत: ला पेटवून घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून तिने खाली उडी टाकली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भाजलेल्या अवस्थेत पूजाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे.

(PUBG खेळात हरल्याच्या राग, आईसह भावंडांचा खून; पाकिस्तानातही गेमवर बंदीची शक्यता)

दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे पूजाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पूजाने जेव्हा इमारतीवरून उडी मारली तेव्हा तिला शेजाऱ्याच्या लोकांना पाहिले होते.  याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

First published:
top videos