मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मित्रांकडून हत्येचा कट, मृत झाल्याचं समजून रुग्णालयात पोहोचवलं, मात्र 2 महिन्यांनंतर...

मित्रांकडून हत्येचा कट, मृत झाल्याचं समजून रुग्णालयात पोहोचवलं, मात्र 2 महिन्यांनंतर...

दोन महिन्यांनी या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला.

दोन महिन्यांनी या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला.

दोन महिन्यांनी या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला.

  • Published by:  Meenal Gangurde

रांची, 14 जून : तीन मित्रांनी आपल्याच एका मित्राच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार (Jharkhand News) समोर आला आहे. शेवटी त्याच मित्राने भांडफोड केला. मिळालेल्या माहितीनुसार, या तीन मित्रांनी आधी पीडिताचे हात तोडले, अन् रॉडने शरीरभर वार केले. तो मृत झाला असं समजून (Try to kill friend) त्याला रुग्णालयात नेलं, अन् घरातील सदस्यांना अपघाताची खोटी कहाणी सांगितली.

फिरण्याच्या बहाण्याने घेऊन गेले अन्...

पीडित मेराज आणि त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, 7 जानेवारीच्या सायंकाळी त्याचे मित्र सन्नी आणि सागर पेलावल फिरण्याच्या बहाण्याने मेराजला सोबत घेऊन गेले. ते मेराजना जंगलाजवळील भागात घेऊन गेले. जंगलात पोहोचताच मित्रांनी मेराजला रॉडने मारायला सुरुवात केली. यानंतर मेराज गंभीर जखमी झाला. तो मृत असल्याचं समजून तिघांनी त्याला रुग्णालयात पोहोचवलं अन् कुटुंबीयांना याबाबत सूचित केलं. त्यांच्यावर कोणी संशय घेऊ नये यासाठी या घटनेला अपघाताचं स्वरुप दिलं.

दोन महिन्यांनंतर शुद्धीत आला...

मेराजच्या अपघाताबद्दल कळताच कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. जखमी अवस्थेत त्याला रांचीला शिफ्ट करण्यात आलं. यानंतर दोन महिने त्याच्यावर लाइफ केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी तो शुद्धी आला. अन् त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी कडक शिक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतलं असून तुरुंगात रवानगी केली आहे. मात्र अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. अद्याप मारहाणीचं कारण समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Crime news, Friendship, Jharkhand