मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोशल मीडियावर जादूटोण्याचा व्यवसाय; ऑनलाइन जाहिरात देत मांत्रिकाने केली लाखोंची लूट

सोशल मीडियावर जादूटोण्याचा व्यवसाय; ऑनलाइन जाहिरात देत मांत्रिकाने केली लाखोंची लूट

आतापर्यंत आपण सायबर क्राईमचे प्रकार पाहिले असतील, मात्र तंत्रविद्या करणारे देखील ऑनलाइन फ्रॉड करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

आतापर्यंत आपण सायबर क्राईमचे प्रकार पाहिले असतील, मात्र तंत्रविद्या करणारे देखील ऑनलाइन फ्रॉड करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

आतापर्यंत आपण सायबर क्राईमचे प्रकार पाहिले असतील, मात्र तंत्रविद्या करणारे देखील ऑनलाइन फ्रॉड करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

राजस्थान, 6 मार्च : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. केवळ सायबर क्राइमच नव्हे तर मांत्रिकही फेसबुक आणि सोशल मीडियावर जाहिरात देत फसवणूक करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे मांत्रिक लोकांना धमकी देत लाखो रुपयांची लूट करतात. अशीच एक घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातून उघडकीस आली आहे.

पंजाब येथे राहणारा मांत्रिक काही रुपयांसाठी ऑनलाइन जाहिरात देत होता आणि देशातील विविध भागातील लोकांना धमकी देत त्यांच्याकडून पैसे उतळत होता. मांत्रिकाने बाडमेरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवत 274000 रुपयांची लूट केली. इतकच नाही तर आरोपी तांत्रिक घरातच शांती करण्यासाठी तंत्रविद्या करीत असल्याचं सांगून 10 दिवसात कुटुंबाकडून 25 वेळा पैसे मागवले. (The business of witchcraft on social media he robbed millions by advertising online)

हे ही वाचा-जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला बलात्कार प्रकरणातील आरोपी

ही घटना राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील आहे. येथे राहणाऱ्या जोगाराम यांचा मुलगा अर्जुनसोबत हा प्रकार घडला. पोलीस ठाण्याचे प्रमुख मूलाराम चौधरी यांनी सांगितलं की, आरोपी तांत्रिक दीपक कुमारला पंजाबमधील त्याच्या घरातून पकडण्यात आलं आहे. सोबतच त्याच्याक़डून 2.09 लाख रुपये जप्त करण्यात आले. सुरुवातीला आरोपी सोशल मीडियावर तंत्र-विद्याची जाहिरात देत असे, त्यानंतर घरात सुख-शांती लाभण्याच्या नावाखाली तो लोकांची फसवणूक करीत असे.

यानंतरही आरोपी तांत्रिक कुटुंबीयांची तंत्रविद्याच्या नावावर भीती निर्माण करीत असे. (The business of witchcraft on social media he robbed millions by advertising online) आरोपीने आतापर्यंत अशा प्रकारे अनेक कुटुंबांना फसवलं आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करीत आहे. याबाबत पोलीस म्हणाले की, मांत्रिकांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. घरात शांती व सुखासाठी तांत्रिक विद्या करीत असल्याचे सांगून मांत्रिक पीडितांकडून पैसे उकळतात व देण्यास नकार दिल्यास भीती निर्माण केली जाते. आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Money fraud, Online crime