Home /News /crime /

रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले दगड, दौंडमध्ये धक्कादायक घटना

रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले दगड, दौंडमध्ये धक्कादायक घटना

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता या ठिकाणी दगड, दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या.

    सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड, 04 ऑक्टोबर : दौंड शहरातील प्रसिद्ध फोटोग्राफर केदार भागवत यांची अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अज्ञात ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी  लिंगाळी गावच्या हद्दीत काळे मळा याठिकाणी कॅनेलच्या बाजूला ही घटना घडली आहे. लिंगाळी हद्दीतील काळे मळा येथील कॅनलवर एक पुरूष मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता हा मृतदेह केदार भागवत यांचा असल्याचे समोर आले. धक्कादायक! आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायरचा बॉम्बस्फोटात मृत्यू पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता या ठिकाणी दगड, दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. अज्ञात मारेकऱ्याने केदार भागवत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाचे आदेश दिले आहेत. केदार भागवत यांच्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधात आड येणाऱ्या सासऱ्याला जावयाने ठार मारले दरम्यान, बिहार जिल्ह्यातील वैशालीमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या आड येतो म्हणून जावयाने आणि सासूच्या मदतीने  सासऱ्याला बेदम मारहाण करून जीव ठार मारल्याची घटना समोर आली आहे. ...नाहीतर MPSC परीक्षा केंद्र फोडून टाकू, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा मृत तिलक राय याची पत्नी सविता हिचे आपल्याच जावयासोबत अनैतिक संबंध होते. जावई मोहन राय हा समस्तीपूर भागात राहणार होता. लग्नानंतर तो सासरी मुरौवतपूरमध्ये येऊन राहत होता. काही दिवसांनी मोहन आणि सासू सविता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. याची माहिती मृत तिलक राय याला कळाली. त्यामुळे तो दोघांनाही विरोध करत होता. त्याने दोघांचीही समजूत काढली. पण दोघांनी त्याचे काही ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्या नेहमी वाद होत होता. याच वादातून पुन्हा जावई मोहन आणि तिलक रायमध्ये शनिवारी भांडण झाले. त्यावेळी मोहन याने बेदम मारहाण करून सासरा तिलक राय याला ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह हा त्याच्याच भावाच्या घराच्या छताला लटकवला होता. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले. दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: खून, दौंड, हत्या

    पुढील बातम्या