मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नाच्या 24 तासांनंतर नववधुला सोडून नवरदेव गायब; पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र...

लग्नाच्या 24 तासांनंतर नववधुला सोडून नवरदेव गायब; पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र...

काही तासांपूर्वी घरात आनंदाचं वातावरण होतं, आता मात्र कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काही तासांपूर्वी घरात आनंदाचं वातावरण होतं, आता मात्र कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काही तासांपूर्वी घरात आनंदाचं वातावरण होतं, आता मात्र कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मरोहा, 30 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमरोहा जनपदमध्ये एक अनोखं प्रकरण समोर आला आहे. जे एकून तुम्ही हैराण व्हाल. अमरोहामध्ये लग्नाच्या 24 तासांनंतर नवरदेवाने आपल्या नवरीला सोडलं आणि घरातून गायब झाला. नवरी आपल्या पतीची वाट पाहत आहे. जेव्हा मध्यरात्र उलटून गेली, त्यानंतरही नवरदेव घरी पोहोचला नाही. कुटुंबीयांनी याची माहिती अमरोहा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी नवरदेव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. घरात आनंदाच्या ऐवजी शोक केला जात आहे.

ही घटना ऐकून गावातील नागरिकही हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमरोहा जनपदमधील अमरोहा नगर पोलीस ठाणे हद्दीत मोहल्ला कुरैशीच्या शिव दुआरा येथील आहे.  येथे राहणाऱ्या खुर्शीद आलम याचं लग्न 27 जानेवारी रोजी झालं होतं. लग्नाच्या कार्यक्रमात कुटुंबातील सर्वजण सामील झाले होते. यामुळे घरात आनंद साजरा केला जात होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नाच्या 24 तासांनंतर म्हणजे 29 जानेवारी रोजी नवरदेव आपल्या नववधुला सोडून गायब झाला. खुर्शीद आपल्या नववधुला औषध आणण्यासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला, ते परत आलाच नाही.

हे ही वाचा-राम मंदिर उभारणीसाठी मुस्लीम समाज सरसावला; मुंबईतील अभियानात दान केला मोठा निधी

मध्य रात्र उलटल्यानंतर वधुने चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या सासरच्या मंडळींना खुर्शीद विषयी विचारलं, तर त्यांनाही याबाबत काहीच माहित नव्हतं. जेव्हा लोकांचा याची माहिती मिळाली तर सर्वजण हैराण झाले. काही जणांनी अघटित घडल्याची भिती व्यक्त केली. खुर्शीद बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. दुसरीकडे घरी मात्र नववधु सतत रडत आहे व खुर्शीदची प्रतीक्षा करीत आहे.

First published:

Tags: Crime news, Marriage, Uttar pradesh